गार्गी अबॅकस स्पर्धेत पर्ल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी ‘गुरू मोरे’ दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी!
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर – पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथील इयत्ता दुसरीत शिकणारा गुरू मनोज मोरे याने ‘गार्गी अबॅकस’ स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांतून दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला आहे.
गुरू मोरेच्या या यशामुळे संपूर्ण शाळेचे नाव उजळले असून, संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत भदाणे सर, प्राचार्य व शिक्षकवृंद यांच्या हस्ते त्याचा फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल सर्व स्तरांतून गुरूवर कौतुकाचा वर्षाव होत असून, शाळेच्या गुणवत्तेचीही पुनःप्रमाणे झलक या कामगिरीतून दिसून येत आहे.