मुंबई-आग्रा महामार्गावरील लक्झरीला भीषण आग — सुदैवाने प्रवासी सुरक्षित

आबिद शेख/ अमळनेर

मुंबई-आग्रा महामार्गावर देव भाने गावाजवळ आज सकाळी सुमारे सहा वाजून तीस मिनिटांनी एका लक्झरी बसला भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की काही वेळात संपूर्ण बस जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिस व आपत्कालीन यंत्रणा उपस्थित असून अधिक तपास सुरू आहे.