राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघ जाहीर.   नाशिक येथे ३५वी सीनिअर राज्य सेपक टकरा अजिंक्यपद स्पर्धा..

0

24 प्राईम न्यूज 26 Jun 2025.


महाराष्ट्र राज्य सेपक टकारा असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि नाशिक जिल्हा सेपक टकारा असोसिएशनच्या आयोजनात ३५वी सीनिअर राज्य सेपक टकारा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नाशिक येथे दिनांक २८ ते ३० जून २०२५ दरम्यान करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याच्या पुरुष व महिला संघांची घोषणा करण्यात आली असून, हे दोन्ही संघ राज्य स्तरावर आपले कौशल्य दाखविणार आहेत. या संघांना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एजाज़ गफ्फार मलीक, कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकांत सोनवणे, उपाध्यक्ष प्रदीप तळवेलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, सचिव इकबाल मिर्झा, प्रशांत जगताप, प्राचार्य बाबू शेख, प्राचार्य नईम शेख, पर्यवेक्षक नाझीम खान, प्रा. वसीम मिर्झा, शेहबाज शेख, आसिफ मिर्झा, सागर सर, मोहसिन पिंजरा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

जिल्हा संघ:पुरुष संघ:फैज़ान शेख (कर्णधार),शेख फैज़ान रईस,अबुज़र बागवान,तनवीर शाह,सैय्यद शिकेब,सैय्यद ऊवेस,उमर ज़िया बागवान,बागवान मो. हम्माद,शेख रेहान,अमजद अहेमद,अमोल पन्नालाल,खान मो. रेहान, सचिन धनराज,राहुल वसंत,तंबोली मो. अदनान महिला संघ:,समीक्षा छाडेकर,केतकी महाजन,साक्षी पाटील,संजना बघेले,श्रुती पाटील,ऋतुजा पाटील,पूजा पाटील

संघ व्यवस्थापक: ममता, सागर सोनवणे
संघ प्रशिक्षक: मिर्झा आसीफ, आमीर खान

या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून यशस्वी ठरलेल्या खेळाडूंची निवड पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात केली जाणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!