छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरास अमळगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आणि गतिमान प्रशासन तसेच आपत्कालीन व्यवस्थेच्या बळकटीकरण अंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” दिनांक 26 जून 2025 रोजी अमळगाव (ता. अमळनेर) येथे लता रमण मरेज हॉलमध्ये आयोजित करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी मा. श्री. नितीनकुमार मुंडावरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबीरात अमळगाव मंडळातील अंमळगाव, पिंपरी प्र.ज.जळोद, दोघवद, हिंगोणे खु. प्र.ज., निंभोरा, सात्री, पिंगळवाडे, मेहेरगाव, मुडी आदी गावांतील सुमारे 500 ते 550 नागरिकांनी उपस्थिती नोंदवली.
शिबीरात तहसिलदार श्री. रुपेशकुमार सुराणा, निवडणूक नायब तहसिलदार प्रशांत धमके, संजय गांधी योजना नायब तहसिलदार राजेंद्र ढोले यांच्यासह तालुका पातळीवरील विविध कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक विभागाने स्वतंत्र स्टॉल उभारून नागरिकांच्या तक्रारी व अडचणींचे निराकरण केले. तसेच विविध योजनांचे लाभ देखील वितरित करण्यात आले.
मुख्य सेवा व लाभ:
पुरवठा शाखा: 103 नवीन व दुबार शिधापत्रिका वाटप
संगायो शाखा: 04 कुटुंब अर्थसहाय्य धनादेश वाटप, 237 डीबीटी प्रक्रिया पूर्ण, 05 नवीन अर्ज
सेतु शाखा: 93 उत्पन्नाचे दाखले, 37 राष्ट्रीयत्व, 37 रहिवासी, 21 जातीचे दाखले, 109 आधार नोंदणी, 91 आधार दुरुस्ती
पंचायत समिती: 03 जलतारा प्रशासकीय मान्यता, 01 फळबाग मंजूर
या शिबीरात वंचित लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व धनादेशांचे वितरण मा. उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना तहसिलदार श्री. रुपेशकुमार सुराणा यांनी केली, तर आभारप्रदर्शन उपशिक्षक श्री. संजीव पाटील यांनी केले.