पर्यावरण संवर्धनासाठी अमळनेरमध्ये युवकांसाठी खास श्रमसंस्कार छावणी!                               १९ व २० जुलै रोजी अमळनेरमध्ये पर्यावरण स्नेही दुसरी युवा श्रम कर्तव्य संस्कार छावणी..

0

आबिद शेख/अमळनेर


“संकल्प पर्यावरण संवर्धनाचा – पर्यावरण संवर्धक व्यवस्था निर्माणाचा, स्वयं शिस्तीतून – समूह शिस्ती कडे” या विचारधारेतून साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने दुसरी युवा श्रम कर्तव्य संस्कार छावणी आयोजित करण्यात आली आहे. ही छावणी दिनांक १९ व २० जुलै २०२५ रोजी अमळनेर येथे पार पडणार असून वयोगट १५ ते २५ वर्षांतील युवक-युवतींसाठी ही एक अनोखी संधी आहे.

या छावणीत मिळणार आहे:

-निसर्ग सान्निध्यात निवास व जेवणाची सुविधा. -साने गुरुजी आणि त्यांच्या समकालीन कार्याची माहिती. -मुल्यसंस्कार, कुटुंब आणि समाजप्रती जबाबदारी. -पर्यावरण, जैवविविधता, झाडं-पक्षी ओळख. -गोष्टी, गाणी, नृत्य, वनभोजन आणि पारंपरिक खेळ. -ट्रेकींगचा अनुभव – डोंगर, माती, पाणी यांचा सहवास. -पर्यावरण स्नेही जीवनशैलीची ओळख

नोंदणी अंतिम तारीख: १५ जुलै २०२५

छावणीची सुरुवात १९ जुलै रोजी सकाळी ९ ते १० दरम्यान, अमळनेर बसस्थानक / रेल्वे स्टेशन किंवा साने गुरुजी कर्मभूमी स्मारक, गलवाडे बु. येथे उपस्थित राहून होईल सहभागी सर्वांना प्रमाणपत्र दिले जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क: 9075570510

निसर्गासाठी, आपल्या भविष्यासाठी – चला एक पाऊल पुढे टाकूया! 🌿


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!