एच.आय.व्ही. सह जगणार्या अनाथ मुलांना प्रोटीन टिन सप्लीमेंट किट…

अमळनेर(प्रतिनिधि) अमळनेर रोटरी क्लब मागील तीन वर्षांपासून अमळनेर येथील एड्स सोबत जगणार्या अनाथ मुलांसाठी आधार बहुद्देशीय संस्थे सोबत काम करत आहोत व त्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य करत आहे.
रोटरी सप्ताह ( रोटरी विक ) अंतर्गत लायन्स पास्ट प्रेसिडेंट M.J.F विनोद अग्रवाल याच्या कडून प्रोटीन किट व लानेस डॉ. सपना नितीन पाटील संस्थेकडून कडधान्य वाटप चा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रो.अजय भाऊ केले होते.तसेच कार्यक्रमाला सौ.श्रद्धा विनोद अग्रवाल,हरिओम अग्रवाल,कुशल संजय गुलेछा, अध्यक्ष कीर्ती कुमार कोठारी, क्लब सेक्रेटरी तहा बुकवाला ,प्रोजेक्ट चैरमन राजेश जैन,रो.महेश पाटील,रो. अरविंद मुठे, व
सर्व रोटरी सभासदांनी उपस्थित दशवली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणू प्रसाद मॅडम नी केले. . तसेच आधार बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील,अश्विनी , संजय कापडणे, ताशिफ शेख , पूनम पाटील,मोहिनी पाटील, यांनी आपला सहभाग दरशिवला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रो.अजय केले यांनी आपल्या भाषणात पुढील महिन्याचे प्रोटीन किट व कडधान्य हे माझ्याकडून असेल असे घोषित केले. तसेच सर्व रोटरी सभासदांची उपस्थिती त्या मुलांना व त्यांच्या परिवाराला खुप धिर देण्याचे काम केले. अशी माहिती रोटरी क्लबचे P.R.O रो. आशिष चौधरी यांनी दिली.