गुरे चोरून ट्रक जाडणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या…जळगाव पोलिसांची कारवाई..

0

जळगाव (प्रतिनिधि) गुरांनी भरलेल्या ट्रकचा पाठलाग करुन त्यातील गुरे उतरवून ट्रक जाळणा-या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अक्षय सुनिल पाटील, निखील चंद्रशेखर पाटील, चेतन रविंद्र पाटील, भटु दिलीप पाटील (रा. शनीपेठ वर्णेश्वर महादेव रस्त्यावर पैलाड, अमळनेर जिल्हा जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
अमळनेर धरणगाव रस्त्यावर कुल्हे शिवारात घडलेल्या या घटनेप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गु.र.नं. ५८ / २०२३ भादवि कलम १४३, १४७, १४९, ३३७, ४३५ नुसार अज्ञात आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु होता. या गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. संदिप पाटील, पोना प्रविण मांडोळे, परेश महाजन, दिपक शिंदे आदींनी सहभाग घेतला. गुन्ह्यात वापरलेले वाहन मारुती एरीगा हे वाहन जप्त करण्यात आले असून चौघांना पुढील तपासकामी अमळनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!