डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार सोहळा २६ जुलै रोजी पुण्यात — न्यायमूर्ती असीम सरोदे यांचे मार्गदर्शन लाभणार..

24 प्राईम न्यूज 9 Jul 2025
ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारत रत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव आणि समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन येत्या २६ जुलै २०२५ रोजी पुणे येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे कायदेपंडित अॅड. असीम सरोदे यांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. डॉ. नितीन वाघमोडे (आयकर आयुक्त, पुणे) भूषवणार असून, मा. श्री. अनिल भिमराव जाहीर (तनिष्का फाऊंडेशन), ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज (मठाधिपती, संत बागडेबाबा आश्रम, संख) यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग —
मा. वैशाली मार्तंड चव्हाण (सहाय्यक आयुक्त, पुणे महानगरपालिका), मा. राम मांडूरके (सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे), सौ. ममता भोई (खानदेशी अभिनेत्री), सौ. श्वेता परदेशी (मिसेस इंडिया २०२२, इंटरनॅशनल मॉडेल), प्राजक्ता मालुंजकर (रित स्टार/फेम ‘मोह मोह के धागे’) हे सन्मानार्थी पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याचे निवेदन प्रा. घनश्याम चौगुले (महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, उमदी) हे करणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून अजित चौगुले (संपादक, जनदरबार न्यूज) आणि कार्याध्यक्ष श्री. महादेव महानूर (ए.डी. फाऊंडेशन) हे जबाबदारी सांभाळतील.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ए.डी. फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. अशोक श्रीपती गोरड आणि सर्व टीमचे प्रयत्न सुरू आहेत.