“रक्तदान हीच खरी मानवसेवा” — आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसाचा ग्रामिण भागात सेवाभावी जल्लोष

0

बाम्हणे येथे ५०+ युनिट रक्त संकलित; युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग

आबिद शेख/अमळनेर
माजी मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, तथा आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामिण भागातही समाजसेवेची चळवळ जोमात सुरू झाली आहे. बाम्हणे (ता. अमळनेर) येथे आयोजित रक्तदान शिबिरात एकाच गावातून तब्बल ५० हून अधिक रक्ताच्या युनिट्स संकलित करण्यात आल्या — हे मानवीतेचे अत्यंत प्रेरणादायी उदाहरण ठरले.

या शिबिराचे आयोजन जीवनश्री ब्लड सेंटर, अमळनेर आणि जीवनज्योती ब्लड सेंटर, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. वैद्यकीय पथकांनी सुरक्षित रक्तसंकलन प्रक्रियेसाठी प्रत्येक रक्तदात्याची तपासणी केली. रक्तपेढीचे संचालक योगेश महाले व वेदांत कुलकर्णी यांनी जबाबदारी पार पाडली.

या सेवाभावी उपक्रमात महेश धर्मराज पाटील, सरपंच जगदीश पाटील, कळंबू सरपंच राज राजपूत, अमृत पाटील, संजय पाटील, भैय्यासाहेब पाटील, नितीन पाटील, समाधान पाटील, गोविंदा पाटील, शेखर पाटील, विक्की पाटील आदींसह ५० हून अधिक युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विशेष म्हणजे महिलाही रक्तदानात सहभागी झाल्या.

शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये बाम्हणे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व पोलीस पाटील गणेश भामरे, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक अभिजीत देवरे, शिक्षक नंदलाल पाटील, तलाठी सचिन बमनाथ, विकेश भोई, शिपाई अधिकार पाटील, आणि महावितरणचे वायरमन नगराळे आप्पा यांचे मोलाचे योगदान राहिले.

निस्वार्थ सेवेत मग्न कार्यकर्त्यांची यादीही लांबच लांब — धर्मराज रावण पाटील, यशवंत पोपट पाटील, दत्तात्रय पाटील, प्रविण ओंकार पाटील, विजय लोटण पाटील (उपसरपंच), रमेश विनायक पाटील, हिरालाल बाबुराव पाटील, आधार बळीराम पाटील, संतोष पाटील, सुनिल पाटील यांनी संयोजन, सुविधा आणि समन्वयात महत्वपूर्ण भूमिका बजावली.

समाजसेवेची प्रेरणा :

आ. अनिल पाटील हे केवळ राजकीय प्रतिनिधी नसून “जनतेचे आमदार” म्हणून ओळखले जातात. प्रत्येक वाढदिवसाला लोककल्याणाचे उपक्रम राबवणे ही त्यांची कार्यशैली आहे. त्यांचे आरोग्य, शिक्षण व आपत्ती व्यवस्थापनातील कार्य आजही प्रेरणास्थान आहे. रक्तदान उपक्रमासारखी चळवळ यापुढेही सुरू राहून संपूर्ण समाजाला प्रेरणा देईल, असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 97000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73700/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1095/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!