अमळनेरहून चोरलेली कार मध्य प्रदेशात सापडली; पोलिसांची मोठी कारवाई – तब्बल ३ गाड्या जप्त..

0

आबिद शेख/ अमळनेर



अमळनेर -दि. २४ मे २०२५ रोजी रात्री १०.३० ते दि. २५ मे २०२५ रोजी पहाटे ५.०० दरम्यान अमळनेर शहरातील ओमसाई श्रद्धा नगर येथून प्रविण हरिश्चंद्र ठाकूर यांच्या मालकीची मारुती सुझुकी डिझायर (क्र. MH18 AJ3110) ही चारचाकी गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. 0217/2025, भा.दं.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासदरम्यान प्राप्त झालेल्या तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या आधारे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी श्री. विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर गुन्हे अन्वेषण पथकाने मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील सीतामऊ तालुक्यातील रावठी गावात छापा टाकला.

या कारवाईदरम्यान संशयित इसम राहुल पाटीदार याच्या गोडाऊनमधून खालील तीन चोरीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या:

टोयोटा फॉर्च्युनर (पांढरी रंग) – अंदाजे किंमत ₹35,00,000/-
(CR No.0362/2025, नागपूर शहर पो.स्टे.) हुंडाई क्रेटा (पांढरी रंग) – अंदाजे किंमत ₹12,00,000/-
(CR No.0101/2025, जळगाव तालुका पो.स्टे.) मारुती डिझायर (अमळनेरहून चोरी) – किंमत ₹1,50,000/-
(CR No.0217/2025, अमळनेर पो.स्टे.)

या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पो.उप.नि. नामदेव बोरकर, पोलीस शिपाई विनोद संदानशिव, निलेश मोरे, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के तसेच शरद बागल (स्थानीय गुन्हे शाखा) यांनी सहभाग घेतला.

ही कारवाई म्हणजे चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दिशेने अमळनेर पोलीसांची मोठी कामगिरी ठरली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!