महाराष्ट्रभर दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुरूवात..!

धुळे (अनिस अहेमद) महाराष्ट्रभर १०वी आणि १२वी च्या परीक्षा सुरु झाल्या असून यामध्ये धुळे जिल्ह्यात एकूण ६६ परीक्षा केंद्रे देण्यात आली असून त्यापैकी काही संवेदनशील तर काही अतिसंवेदनशील आहेत. धुळ्याचे पोलीस अधिक्षक यांनी परीक्षा केंद्रांना भेट

देऊन सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत तसेच परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना चिटिंग(कॉपी) करू नये व काळजीपूर्वक अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगितले व मन लावुन अभ्यास करून परीक्षेत उत्तीर्ण होण्यास सांगितले तसेच आज परीक्षेचा पहिलाचं दिवस असल्याने मुलांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.