गुरूपौर्णिमेनिमित्त ‘गुरूंचा सन्मान’ कार्यक्रम उत्साहात संपन्न पोलीस विभागातर्फे आदर्श शिक्षकांचा गौरव; SDPO कोते यांचे मार्गदर्शन..

आबिद शेख/ अमळनेर

अनुभव हा आयुष्यातील सर्वात मोठा गुरू असून सकारात्मक दृष्टिकोनच माणसाला यशाच्या शिखरावर नेतो, असे प्रतिपादन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते यांनी केले. अमळनेर पोलिस स्टेशनतर्फे इंदिराभुवन येथे आयोजित ‘गुरूंचा सन्मान’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या संकल्पनेतून, पोलीस अधीक्षक जळगाव आणि अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाने हा सन्मान सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. कोते हे स्वयं होते, तर आयोजन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
पोलीस निरीक्षक निकम म्हणाले की, “शिक्षक हा समाज घडवणारा महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी ‘गुरूंचा सन्मान’ हा एक छोटासा प्रयत्न आहे.”
कार्यक्रमात तालुक्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि दिव्यांग शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. गोकुळ साळुंखे, इंदूबाई महाले, प्रकाश पाटील, दिलीप सोनवणे, महेंद्र पाटील यांचा व्यासपीठावर सत्कार झाला. उपस्थित इतर सर्व शिक्षकांचा जागेवर सत्कार करण्यात आला.
यावेळी विस्तार अधिकारी प्रमोद पाटील, तालुकाध्यक्ष तुषार बोरसे, प्रा. शिला पाटील, प्रमोदिनी पाटील, अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन रणजीत शिंदे, केंद्रप्रमुख शरद सोनवणे, स्वाती पाटील, छगन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय जीभाऊ पाटील, एपीआय रवींद्र पिंगळे, एपीआय सुनील लोखंडे, पो.उ.नि. नामदेव बोरकर, फिरोज बागवान, गणेश पाटील, अशोक साळुंखे, चंद्रकांत पाटील, विनोद भोई, मिलिंद सोनार, लक्ष्मीकांत शिंपी, अमोल पाटील, सिद्धांत शिसोदे, प्रशांत पाटील, जितेंद्र निकुंभे, नितीन कापडणे, शेखर साळुंखे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धांत शिसोदे यांनी मानले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74000/-.
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
शुद्ध चांदी 999% : ₹. 1095/-