“अमळनेर शहरात मोकाट जनावरांचा त्रास सुरूच – नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त!”

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर शहरात मोकाट जनावरांचा त्रास दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, नागरिकांना जीव मुठीत घेऊन फिरावे लागत आहे. जनावरांची खरेदी-विक्री सध्या जनावर बाजारात ठप्प झाल्याने अनेक पशुपालकांनी आपल्या जनावरांची जबाबदारी टाळत त्यांना रस्त्यावर सोडून दिले आहे. यामुळे शहरातील विविध भागांमध्ये गुरे-ढोरे मोकाट फिरत असून, अपघात, वाहतुकीतील अडथळे, मालमत्तेचे नुकसान आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुभाजकामध्ये नगरपरिषदेने झाडे लावून सौंदर्यीकरण केले असले तरी मोकाट जनावरे झाडांची मोडतोड करीत असून हजारोच्या खर्चावर पाणी फिरत आहे. मार्केट परिसर आणि भाजी मंडई परिसरात जनावरे सैरावैरा धावत असल्याने भाजी विक्रेत्यांचे नुकसान होत असून, महिला आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हे सर्व असताना अमळनेर नगरपरिषदेचा प्रशासन मात्र गप्प बसल्याचे चित्र आहे. नागरिक वारंवार तक्रारी करत असूनही कोणताही ठोस बंदोबस्त करण्यात आलेला नाही. नागरिकांची मागणी आहे की, नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून जनतेला दिलासा द्यावा. अन्यथा हा प्रश्न आणखी गंभीर होऊन सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दा बनेल.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1095/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट