धर्मगुरूच्या वेशात मोसादचा एजंट; पंधरा वर्षांनी उघड झाली “शमऊन” ची खऱ्या ओळखीची कहाणी!

0

24 प्राईम न्यूज 11 Jul 2028


तेहरान/क़ुम (ईरान):
ईरानमधून एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. शेख इमामी अल-हादी या नावाने ओळखला जाणारा धर्मगुरू प्रत्यक्षात “शमऊन दिरावी” नावाचा इस्रायली गुप्तहेर निघाला असून, तो मोसाद या इस्रायली गुप्तचर संस्थेसाठी गेली पंधरा वर्षे काम करत होता, हे समोर आले आहे.

शेख इमामी अल-हादी म्हणून ओळख मिळवलेला हा व्यक्ती क़ुम आणि तेहरानसारख्या पवित्र शहरांमध्ये धार्मिक नेतृत्व, फतवे, नमाज आणि धार्मिक प्रवचनांद्वारे शिया समाजाचा विश्वास संपादन करत होता. त्याचा युट्यूब चॅनल हजारो लोक फॉलो करत होते, आणि तो धर्मगुरू म्हणून संपूर्ण देशभर ओळखला जात होता.

लाखो लोकांनी त्याच्या मागे उभं राहून नमाज अदा केली, त्याच्या शब्दांना श्रद्धेने माना डोलावली आणि त्याला एक धार्मिक मार्गदर्शक मानले. मात्र आता समोर आले आहे की तो एक इस्रायली गुप्तहेर होता ज्याने शिया धर्मसत्ता आणि त्यांच्या पवित्र स्थळांमध्ये खोलवर घुसखोरी केली होती.

शेख हादी, उर्फ शमऊन, याने “अल-महदी” या नावाने आपली ओळख निर्माण केली होती. त्याने पगडी घालून, फतवे दिले, दुआ दिल्या, आणि लोकांच्या धार्मिक भावना भडकावत सामूहिक चेतना नियंत्रित करण्याचं काम केलं.

या प्रकरणाने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. शिया धर्मसत्तेच्या केंद्रबिंदूंमध्ये एवढ्या खोलवर घुसखोरी कशी झाली? यंत्रणा झोपल्या होत्या का? आणखी असे किती “शमऊन” आपल्या समाजात आहेत?

ही कहाणी कोणत्याही कादंबरीसारखी वाटत असली तरीही, ती एक थरारक आणि कडवट सत्य आहे — जे आपल्या धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक मोठा इशारा ठरतो.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 97500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1095/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!