हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेच्या अध्यक्षपदी मोना शेख; नवीन कार्यकारिणी जाहीर..


अमळनेर /आबिद शेख
अमळनेर येथील हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेच्या अध्यक्षपदी मोना शेख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या उपाध्यक्षपदी सैय्यद नबी आणि जुबेर पठाण यांची निवड झाली आहे. सचिवपदाची जबाबदारी अजहर अली यांच्याकडे देण्यात आली असून सहसचिव म्हणून अशफाक शेख यांची निवड झाली आहे. संस्थेचे खजिनदार म्हणून आरिफ मेमन यांची निवड झाली आहे. याशिवाय सदस्य म्हणून हाजी शब्बीर अली, जाकिर शेख, मुत्तलिब खाटीक आणि इम्रान शेख यांची निवड करण्यात आली आहे.

ही संस्था वर्षानुवर्षे सामूहिक विवाह, आरोग्य तपासणी शिबिरे अशा उपक्रमांचे आयोजन करून समाजासाठी मोलाचे योगदान देत आहे. विशेषतः गरीब कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी संस्थेमार्फत दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात येते. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळतो.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे संस्थेच्या सामाजिक कार्यात अधिक गती येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.