धुळेच्या साहसी मुलींचा नफरतविरोधी निर्धार!”उदयपूर फाईल” चित्रपटाच्या विरोधात निवेदन, समाजात शांततेचा संदेश..

आबिद शेख/अमळनेर

📰
— चार समाजसेविका, एकजूट आवाज
“आम्ही नफरत नव्हे, माणुसकी आणि प्रेमाचा संदेश देऊ!”

धुळे – समाजात तणाव निर्माण करणाऱ्या ‘उदयपूर फाईल’ चित्रपटाचा शांततेच्या मार्गाने विरोध करत, धुळ्याच्या चार महिलांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. फरजाना शाह, शबनम खातिक, जोहरा शेख आणि जुलैखा शेख या चार समाजसेविकांनी हा पुढाकार घेत समाजात शांतता, सौहार्द आणि एकतेचा संदेश दिला. या महिलांनी स्पष्ट संदेश दिला:
“आम्हाला नफरत नको, माणुसकी हवी!”
समाजात धार्मिक तेढ वाढवणाऱ्या चित्रपटांचा निषेध करत, या महिलांनी सांगितले की अशा प्रकारे लोकांच्या भावना भडकवणे हे देशाच्या एकतेस धोकादायक आहे.
फरजाना शाह म्हणाल्या,
“आपण अशा चित्रपटांचा विरोध करतो कारण ते समाजात विघटन घडवतात. आपल्या पुढच्या पिढीला आपण एकता आणि शांततेचा वारसा द्यायला हवा.”
शबनम खाटीक यांनी नमूद केले,
“आम्हाला कोणाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा विरोध करायचा नाही, पण नफरतच्या राजकारणाला थांबवायला हवे. आम्ही संविधान आणि कायद्यावर विश्वास ठेवतो.”
समाजातील सलोखा टिकवण्यासाठी आणि शांततेचा संदेश देण्यासाठी पुढे सरसावलेल्या या महिलांचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.