एरंडोल तालुका विधी सेवा समिती तर्फे ‘मिशन वात्सल्य’ शिबीराचे आयोजन..

एरंडोल (प्रतिनिधि) येथील तालुका विधी सेवा समिती, एरंडोल आणि तालुका वकील संघ, एरंडोल यांच्या संयुक्त विदयमानाने दिनांक २२ फेब्रुवारी, २०२३ रोजी एरंडोल पंचायत समिती सभागृह येथे मिशन वात्सल्य अंतर्गत कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले.
त्याअनुषंगाने दिनांक २२ फेब्रुवारी, २०२३ रोजी एरंडोल पंचायत समिती सभागृह येथे अॅड श्री. दिपक एस. पाटील, अॅड श्रीमती प्रतिभा पाटील, श्रीमती उर्मिला बच्छाव, संरक्षण अधिकारी एरंडोल आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती एस.एस. चौधरी, बाल विकास प्रकल्प अधिकारी एरंडोल यांनी कायदेविषयक व शासनांच्या विविध योजना या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. नितीन व्ही. बेडिस्कर यांनी केले.
सदर कार्यक्रमास श्रीमती एस.एस.चौधरी, बाल विकास प्रकल्प अधिकारी एरंडोल, श्रीमती उर्मिला बच्छाव, संरक्षण अधिकारी एरंडोल, अॅड श्री. दिपक एस. पाटील, अॅड श्रीमती प्रतिभा पाटील, श्रीमती महाजन मॅडम, श्रीमती बडगुजर मॅडम, श्रीमती कुलदर्शिनी पाटील इ. तर तालुका विधी सेवा समिती तर्फे श्री. राजु बी. भोई आणि श्री. नितीन व्ही. बेडिस्कर हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमांस अंदाजे ७० जणांची उपस्थिती होती.
——————————-