रात्री हिवाळा ..तर
दिवसा उन्हाळा….!

एरंडोल (प्रतिनिधि )-जवळपास पंधरा दिवसापासून वातावरणात बदल झाल्यामुळे मध्यरात्री पासून पहाटेपर्यंत हिवाळा जाणवतो तर दिवसा अकरा वाजेपासून सायंकाळी चार वाजेपर्यंत रखरखीत उन्हाचा अनुभव येतो या विषम हवामानामुळे सर्दी ,खोकला, मलेरिया यासारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते घराघरात रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगितले जाते विशेष करून सर्दी व खोकला यांचे प्रमाण जास्त दिसून येते.
विशेष आहे की २२ फेब्रुवारी रोजी आकाशात ढगांचे सुद्धा दर्शन झाले त्यावरून उन्हाळा ,हिवाळा त्यात पावसाळा अशा तिन्ही ऋतूंचा अनुभव जाणवत आहे.