एरंडोल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न‌…

0


एरंडोल (प्रतिनिधि) येथे 22 फेब्रुवारी रोजी माजी आमदार कै. दादासाहेब दि.शं पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त. डी डी एस पी महाविद्यालय व सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिर सूर्योदय ज्येष्ठ नागरिक भवन येथे घेण्यात आले. हृदय रोग तज्ञ डॉक्टर दीपक शिंदे व लॅप्रोस्कोपीक लेझर सर्जन डॉक्टर रोहनकुमार जगताप यांनी हृदयविकाराचा झटका कसा येतो, तो कसा टाळता येईल, याविषयी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन केले.
सदर शिबिरात कार्डिओलॉजी तपासणी, शुगर लेव्हल, बीपी, हृदयाचे ठोके, इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या तसेच अपेंडिक्स, हर्निया मुळव्याध, पित्ताशयाची शस्त्रक्रिया आतड्यांचे आजार. याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात १७४ नागरिकांनी तपासणी करून घेतली. अशी माहिती महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील यांनी दिली.
सदर शिबिरास अंजना हार्ट हॉस्पिटल धुळे येथील डॉक्टरांची टीम यांनी तपासणी कामे सहकार्य केले. सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण माळी यांनी ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आरोग्याविषयी कसे जागृत राहावे असे मार्गदर्शन केले व सर्व ज्येष्ठ नागरिक सदस्यांनी स्वतःची तपासणी करून घेतली. ‌ सदर शिबिर यशस्वीतेसाठी डी डी एस पी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद व अमितदादा फाउंडेशन एरंडोल यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!