एरंडोल येथे पोलीस निरीक्षक पदाचा सतीश गोराडे यांनी स्वीकारला पदभार..

एरंडोल (प्रतिनिधि) येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांची जळगाव येथे जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला बदली झाली असून त्यांच्या रिक्त पदावर सतीश गोराडे यांची नियुक्ती झाली आहे. सतीश गोराडे यांनी २३ फेब्रुवारी गुरुवारी रोजी एरंडोल पोलीस स्टेशनची कामकाजाची सूत्रे हाती घेतली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांनी नवनियुक्त पोलीस निरीक्षक गोराडे यांचे बुके देऊन स्वागत केले
गोराडे यांची यापूर्वी पश्चिम देवपूर धुळे, नागपूर, मुंबई, इत्यादी ठिकाणी सेवा झाली आहे.