अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या एरंडोल तालुका अध्यक्षपदी अँड. मधुकर बी देशमुख यांची नियुक्ती .

एरंडोल ( प्रतिनिधि) युवा नेतृत्व, धडाडीचे कार्य तसेच समाजकार्य याची आवड असल्या कारणाने त्यांची तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली अधिवक्ता परिषद ही समाजात कायदेशीर अडचणी व समाज हितासाठी कार्य करीत असते तसेच कायदेशीर अडचणी कशा स्वरूपात दुर करता येईल यासाठी कार्य करीत असते. ह्या अधिवक्ता परिषदेची १९९२ साली दिल्ली येथुन सुरूवात करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाचे जष्टीस व कायदेतज्ज्ञ वकील यांनी मिळुन ही अधिवक्ता परिषदेची सुरुवात केली आहे. तसेच यासोबत उपाध्यक्ष पदी अँड ज्ञानेश्वर बळीराम महाजन व अँड.प्रतीभा वसंत पाटील,सचिव पदी अँड. एम ओ काबरा ,सहसचिव पदी अँड. सुजीत यु पाठक अँड. अजिंक्य एम काळे,कोषाध्यक्ष पदी अँड. आकाश निंबा महाजन,व निमंत्रित जेष्ठ सदस्य म्हणून अँड अरुण पी देशमुख व अँड कैलास जी भाटिया यांच्या नियुक्त्या महाधिवक्ता परिषदेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष अँड.प्रवीण चंद्र जंगले यांच्या मार्गदर्शना खाली नियक्त्या करण्यात आल्या सदर वेळी अँड.प्रदीप कुलकर्णी सचिव, उपाध्यक्ष अँड.प्रवीण झवंर सर व अँड.संभाजी जाधव, सहसचिव अँड.चंद्रकांत लोहार व कार्यकारिणी सदस्य अँड.श्रिराम बारी यांची उपस्थिती होती.