रेल्वे वेळापत्रक बदलामुळे प्रवाशांचे हाल — खासदार स्मिता वाघ यांची लोकसभेत मागणी..

आबिद शेख/अमळनेर

नवी दिल्ली/जळगाव | २९ जुलै २०२५
कोविडनंतर बदललेल्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातील हजारो प्रवाशांचे हाल होत असून, हे वेळापत्रक तातडीने पूर्ववत करावे, अशी ठाम मागणी खासदार स्मिता वाघ यांनी आज लोकसभेत केली. नियम ३७७ व हव्हर्स अंतर्गत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

खासदार वाघ यांनी विशेषतः गाडी क्र. 19005 – सुरत-भुसावळ एक्सप्रेस बाबत चिंता व्यक्त केली. यापूर्वी ही गाडी उधना स्थानकावरून रात्री ११:२७ वाजता सुटून सकाळी ८:४५ वाजता जळगाव येथे पोहोचत होती. मात्र आता ती सकाळी ७:०० वाजता जळगावला पोहोचते. यामुळे प्रवाशांना रात्री ३ वाजता उठून प्रवास करावा लागत असून, विद्यार्थ्यांपासून ते महिला, नोकरदार, व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांवर मानसिक, शारीरिक व आर्थिक ताण निर्माण झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
तसेच, गाडी क्र. 11113 – देवलाली-भुसावळ एक्सप्रेस पूर्वी चाळीसगावला सकाळी ७:४० व पाचोऱ्याला ८:३० वाजता पोहोचत होती. सध्याच्या वेळापत्रकामुळे या मार्गावरील प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
खासदार वाघ यांनी स्पष्ट केले की, जळगाव, भुसावळ, पाचोरा व चाळीसगाव भागांतील ५,००० पेक्षा अधिक विद्यार्थी, महिला, नोकरदार व ज्येष्ठ नागरिक या बदलामुळे प्रभावित झाले आहेत.
“ही मागणी केवळ वेळेची नाही, तर प्रवाशांच्या मूलभूत हक्कांसाठीची आहे. केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने तातडीने पावले उचलावीत,” असे आवाहन त्यांनी केले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75700/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट