मंगरूळ ते पिंपळे रस्त्याची बिकट अवस्था : अपघाताच्या घटना वाढल्या, प्रशासन गप्प!

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यातील – मंगरूळ ते पिंपळे दरम्यानचा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पिंपळे गाव ते आश्रम शाळा पुढेपर्यंतचा काही अंतराचा नवा रस्ता तयार झाला असला तरी अंदाजे एक किलोमीटरचा भाग अद्यापही खराब अवस्थेत आहे.

मंगरूळ येथील शनी मंदिरानंतर सुरू होणारा हा अपूर्ण रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी भरलेला आहे. वाहन चालकांना विशेषतः मोटरसायकलस्वारांना त्या ठिकाणी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेले दोन-तीन दिवसात डबल सीट मोटारसायकलस्वारांचे अपघात घडले आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
तसेच, नुकताच तयार झालेला रस्ताही नीट टिकलेला नाही. रस्ता बांधून जेमतेम दीड महिना उलटत असतानाच त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. यावरून कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. साईट पट्टे देखील भरलेले नसल्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढला आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप प्रशासनाने किंवा संबंधित ठेकेदाराने याकडे लक्ष दिलेले नाही. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व महिला वर्ग देखील त्रस्त झाले आहेत.
– प्रशासनाने त्वरीत हस्तक्षेप करून उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करावे आणि खड्डे भरून योग्य रस्ता द्यावा अशी मागणी होत आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75700/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट