राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाचे यश..

0

अमळनेर (प्रतिनिधि) बी.पी. कला, एस.एम.ए. विज्ञान आणि के.के.सी. वाणिज्य महाविद्यालय आर.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालय, चाळीसगाव येथे दिनांक- 20 फेब्रुवारी 2023 रोजी डॉ.एम.बी.पाटील राज्यस्तरीय वाणिज्य आणि व्यवस्थापन प्रश्नमंजुषा स्पर्धा- 2023 आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेमधील तीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात आपल्या महाविद्यालयाला दुसऱ्या क्रमांकाचे सांघिक पारितोषिक मिळाले. तसेच कु.हेमांगी गिरीश धर्माधिकारी या विद्यार्थिनीला “Best Performer Participants” (रु.500 रोख, प्रमाणपत्र) हे पारितोषिक मिळाले.

या स्पर्धेमध्ये खालील यशस्वी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

  1. गुंजन मोहन जैन (M.Com. I)
  2. हेमांगी गिरीश धर्माधिकारी (M.Com. II)
  3. गौरव संजय पाटील (S.Y.B.C.A.)

सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेचे प्रमुख तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापिकांनी मार्गदर्शन केले. संघव्यवस्थापक म्हणून डॉ.अनिल झळके यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली.

खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष-श्री.हरी भिका वाणी, कार्योपाध्यक्ष-श्री.योगेश मुंदडे, सर्व माननीय संचालक मंडळ, मा.चिटणीस तसेच प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व उपप्राचार्य, IQAC समन्वयक व सर्व प्राध्यापक बंधू-भगिनीं व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वीतांचे हार्दिक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!