शिरपूर पोलीसांची मोठी कामगिरी इंदौर हुन धुळे कडे हत्यार घेऊन जाणारी गाडी सह आरोपींना अटक.

0

धुळे (अनिस अहेमद) २३/०२/२०२३ रोजी दुपारी १३.०० वाजेचे सुमारास शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सपोनि सुरेश शिरसाठ यांना गु महाराष्ट्रप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, पांढऱ्या रंगाची इटींगा गाडी क्रमांक एम एच ०४ एफ झेड – २००४ हिचे काही इसम इंदोर कडून धुळया कडे गाडीत हत्यार घेवून जात आहेत. अशी बातमी मिळाल्याने सपोनि सुरेश शिरसाठ यांनी पोलीस स्टाफला सदर बातमीची हकिगत सांगून दोन इसमांना पच म्हणून बोलविण्यास सांगून दोन इसम पंच म्हणून येण्यास तयार झाल्याने पंचासह सपोनि श्री सुरेश व पोलीस स्टाफ अशांनी हाडाखेड सिमा तपासणी नाका येथे नाकाबंदी करुन दुपारी १५.०० वाजता संशयीत वाहन मारुती सुझुकी कंपनीची इटींगा गाडी क्रमांक एम एच ०४ एफ झेड – २००४ हि येताना दिसली सदर गाडी पोलीसांनी हात देवून थांबवली असता सदर वाहनातून इसमांना खाली उतरवून सदर वाहनाची तपासणी करता सदर वाहनात एकूण १२ तलवारी, दोन गुप्ती, एक चॉपर, एक बटनचा चाकू, दोन फाईटर व एक मारुती कंपनीची इटींगा गाडी क्रमांक एम एच ०४ एफ झेड २००४ हिचेसह सुमारे ६,२९,१००/- रुपयेचा मुददेमाल मिळून आल्याने तो वाहनासह जप्त करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणी १) सतपाल गिरधर सोनवणे वय २५ वर्षे व्यवसाया ट्रॅक्टर चालक रा. लळींग महादेव मंदीर मागे ता.जि. धुळे २) किरण नंदलाल दुधेकर (मराठे) वय २७ वर्षे व्यवसाय ट्रॅक्टर रा. जुन्नेर मारुती मंदीर जवळ ता.जि. धुळे ३) विकास देवा ठाकरे वय ४० वर्षे व्यवसाय ट्रॅक्टर चालक रा. लळींग महादेव मंदीर जवळ ता.जि.धुळे ४) सखाराम रामा पवार वय ४५ धंदा मजुरी रा. लळींग महादेव मंदीर जवळ ता.जि धुळे ५) सचिन राजेंद्र सोनवणे (पाटील) वय २८ वर्षे व्यवसाय पाणी पुरी रा. अवधान पाण्याचे टाकी जवळ ता.जि. धुळे ६)राजू अशोक पवार वय २६ वर्षे व्यवसाय ट्रॅक्टर चालक रा. जुन्नेर ता जि. धुळे ७) विशाल विजय ठाकरे वय २७ वर्षे धंदा मजुरी रा. महादेव मंदीर जवळ लळींग ता.जि. धुळे ८) संतोष नामदेव पाटील वय २२ वर्षे व्यवसाय खाजगी नोकर रा. जुन्नेर ता.जि. धुळे ९) अमोल शांताराम चव्हाण वय २० वर्षे व्यवसाय मजुरी रा जुन्नेर ता. जि. धुळे १०) विठठल हरबा सोनवणे वय ३८ वर्षे व्यवसाय मजुरी रा. लळींग ता.जि. धुळे यांचे विरुध्द शिरपूर तालूका पो.ठाणे सी सी टी एन एस गुरन ००२९/२०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास सपोनि सुरेश शिरसाठ हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. संजय बारकुंड सो., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे सो. व पोलीस निरिक्षक श्री अंसाराम आगरकर अति. कार्यभार उपविभागिय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर. यांचे मार्गर्शनाखाली शिरपूर तालूका पोलीस स्टेशनचे सपोनि श्री सुरेश शिरसाठ सो. पोहेकॉ/१२०७ जाकीरोददीन नसिरोददीन शेख, पोहेकॉ/५७८ चतरसिंग लखा खसावद पोहेकॉ/२५७ पवन रामचंद्र गवळी, पोहेकॉ / ११४४ संजय काशिनाथ सुर्यवंशी, पोना/१००४ अरिफ रमजान पठाण, पोना/९०५ संदीप चंद्रकात शिदे, पोकॉ/९१८ रोहीदास संतोष पावरा, पोकॉ/१६७७ योगेश बाळकृष्ण मोरे, चालक पोकॉ/८४संतोष शिवाजी पाटील, चालकपोकॉ/१७ इसरार जकाउल्ला फारुकी अश्यांनी सदर कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!