एरंडोल येथे पत्यांचे क्लब जोरात.खुलेआम सुरु अवैध व्यवसाय.नूतन पोलीस उपनिरीक्षांसमोर आव्हान.

प्रतिनिधी (कुंदन सिंह ठाकुर) एरंडोल शहरात नुकताच नूतन पोलीस निरीक्षक सतीष गोराडे यांनी आपला पदभार स्विकारला असुन त्यांना एरंडोल शहर व परिसरातील अनेक समस्यांना सामोरे जाऊन त्या सोडविण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे.मुख्यतः पत्यांचे अवैध क्लब तसेच नवीन वसाहतींमधील चोऱ्या,मोटार सायकलचोर,हातगाड्यांवर अवैध दारू विक्री,शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील व अंकलेश्वर औरंगाबाद महामार्गावरील काही लॉजिंग वर सुरु असलेला अवैध व्यवसाय,अवैध गुटखा विक्री तसेच एरंडोल व परिसरात अवैध पत्यांचे क्लब खुलेआम सुरु आहेत.याठिकाणी दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे.सदर क्लब हे गावात,शेतात व नविन वसाहती आदि ठिकाणी सुरु असल्याची सर्वत्र चर्चा आहे.यामुळे अनेक तरुण दिवस रात्र या क्लब वर पत्ते खेळत असल्याच्या तक्रारी पालक वर्गांनी केल्या असुन अनेक प्रौढ देखील याठिकाणी पत्ते खेळत असुन त्यांच्या परिवारातील महिलांची तक्रार आहे.
दरम्यान शहरातील मध्यवर्ती ठिकाणी,शहरातील नवीन वसाहतीत,परिसरातील काही हॉटेलवर पत्यांचे क्लब चालत असल्याची जोरदार चर्चा असुन यामुळे अनेक तरुण वाईट मार्गाला व अनेकांचा संसार उघड्यावर पडत असल्याची देखील सर्वत्र चर्चा आहे.या व्यासायाला कोणाचे अभय असुन यावर पोलीस विभाग बघुन न बघल्याची भुमिका घेत असल्याची देखील जोरदार चर्चा आहे तरी या अवैध पत्यांचे क्लब लवकरात लवकर बंद व्हावे अशी मागणी होत आहे.