परिजात कॉलनी ते न्यू पंचशील बोर्डपर्यंत काँक्रीट रस्त्याचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ.!

धुळे (अनिस अहेमद) धुळे शहरातील मुलभूत सुख सुविधांना प्राधान्य देत धुळे शहरातील विविध भागातील रस्त्यांसाठी आमदार फारुख शाह यांनी शेकडो कोटी रुपयाचा निधी शहराच्या विकासासाठी

आणलेला आहे. तसेच आमदार फारुख शाह यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून शहराच्या न झालेल्या रस्त्याच्या कामांसाठी निधी आमदार फारुख शाह यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून परिजात कॉलनी ते न्यू पंचशील बोर्डपर्यंत रस्ता काँक्रीटीकरणाच्या ३० लक्ष रुपयाचा कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आला. धुळे शहरातील विविध भागात भेदभाव न करता सगळ्यांना समान न्याय देत शहरातील रस्ते गटारी संदर्भात आमदार फारुख शाह यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. प्रभाग क्र.१५ मधील नगरसेविका ईशी यांच्या व तेथील नागरिकांच्या मागणी नुसार या रस्त्यांच्या कामांसाठी आमदार फारुख शाह यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे त्यांच्या हस्ते आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळेस डॉ.दीपष्री नाईक,डॉ.पवार,नगरसेवक गनी डॉलर,माजी नगरसेवक योगेश ईशीहरिश्चंद्र लोंढे, जी डी जाधव,शरद चंद्रकांत गांगुर्डे,अशोक भिवासान फिरणे,गोरख शिवदास शिंदे,गुलाबराव,त्र्यंबक भंडारी,काशिनाथ आनंदा परदेशी,दादाजी पांडुरंग पाटील,किरण उत्तमराव मासुळे,गुलाबराव बाजीराव निकुंबे,उत्तमराव नेतकर साहेब,आनंद निंबा बिरारीस,शशिकांत मोहन पाटील,पगारे नाना,शांताराम जगताप,थोरात नाना,मोहन गांगुर्डेकैलास परदेशी, प्रशांत महाले, वाघ साहेब, साहेबराव पगारे, दिलीप पाटील, वसंत कौतिक चव्हाण,आदी उपस्थित होते.