शिवजयंतीनिमित्त डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

धुळे (प्रतिनिधि) शिवजयंती – निमित्ताने फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शहरातील क्युमाइन क्लब भव्य डायरेक्ट हॉलीबॉल या स्पर्धेचे उद्घाटन तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाले.
विभागाच्या जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादीच्या महिला सामाजिक न्याय
शोभा आखाडे यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून १६ संघ महाराष्ट्रभरातून १६ संघ सहभागी झाले असून सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सामने खेळवले जाणार आहे.
यात सहभागी झालेल्या खेळाडूंची निवासासह भोजनाची व्यवस्था देखील आयोजकां च्या वतीने करण्यात आली आहे. या स्पर्धेला जिल्हा
सह महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभल्याने हॉलीबॉल खेळाडूंसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे. स्पर्धे चे हे तिसरे वर्ष असून गेले दोन वर्ष आखाडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे स्पर्धा पार पडल्या आहे. मंजुळाई फाउंडेशन व शोभाताई आखाडे यांच्या संयुक्त विद्यमाने वंचित या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्षा
शोभा आखाडे, तेजस गोटे, तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक विजया पवार , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निशांत रंधे, क्यू माईन क्लब चे अध्यक्ष डॉ. बी. बी माळी, धुळे हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डी. बी. साळुंखे आझाद समाज पार्टीचे आनंद लोंढे, वंचित बहुजन आघाडीचे शंकर खरात, अकबर सर,किरण गायकवाड, उषा पाटील, 9 छाया सोमवंशी, ज्योती चौधरी, सुषमा महाले उपस्थित होते.