जुनेद व नासिर च्या मारेकऱ्याला अटक करून फाशी द्या- भारत मुक्ती मोर्चाची मागणी..

जळगाव (प्रतिनिधि) १५ फेब्रुवारी रोजी राजस्थान येथील भरतपुर जिल्ह्यातील घाटमिटा गावातील दोन तरुण नावे जुनेद व नासिर हे हरियाणा राज्यातील आपल्या सासुरवाडी एका लग्नकार्यासाठी बोलो
रो वाहनाने गेले असता परतताना त्यांना हरियाणा येथील गोपालगड पोलीस स्टेशन अंतर्गत पिरूका गावातील बजरंग दलाचे तथा क्राईम इन्वेस्टीगेशन एजन्सी व हरियाणा पोलीस या तिघांनी संगनमत करून त्यांच्या वाहनाला टक्कर मारून थांबवले.
जुनेद व नासिर ला मारहाण करू त्यांना मरणासन्न केले नंतर फिरोजपुर झिरका पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले व हे गाईची तस्करी करत आहे म्हणून यांच्यावर कारवाई करा परंतु पोलिसांनी जुनेद व नासर ची परिस्थिती बघून त्यांनी या गोरक्षकांना तेथून परत पाठवले. या पाचही आरोपींनी जुनेद व नासिर ला भीवाणी च्या लोहारू जंगलात बोलोरो गाडी सहित जाळून त्यांची निर्दयपणे हत्या केली.

निवासी उपजिल्हाधिकारी नितीन पाटील यांना निवेदन देतांना सुमित्रा अहिरे,फारूक शेख,डॉ शकिर शेख आदी दिसत आहे

१५ फेब्रुवारी रोजी घटना घडवून सुद्धा अद्याप मारेकऱ्यांना अटक न केल्याने भारत मुक्ती मोर्चातर्फे संपूर्ण भारत भरात शनिवार २५ फेब्रुवारी रोजी निदर्शने करून माननीय जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील प्रमुख मागण्या
दोघांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करा व फाशीची शिक्षा द्या,जुनेद व नासिर च्या कुटुंबीयांना एक करोड रुपये नुकसान भरपाई द्या, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी लावा,
भारतात अल्पसंख्यांक समाज म्हणजे मुस्लिम,शीख, ख्रिश्चन, लिंगायत व बौद्ध यांना संरक्षणा साठी कंमूनल प्रेव्हेंशन ऍक्ट बनवा, हरियाणा व राजस्थान येथील जे पोलीस यात सहभागी आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
शनिवार सुटीचा दिवस असतांना निवासी उपजिल्हाधिकारी नितीन पाटील हे कार्यालयात हजर असल्याने शिष्टमंडळाने त्यांना निवेदन देऊन आपली मागणी सादर केली
भारत मुक्ती मोर्चाचे सुमित्रा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे अध्यक्ष डॉक्टर शाकीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान कांबळे, मानियार बिरादरी चे फारूक शेख, राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मझहर खान, ईद गाह ट्रस्ट चे अनिस शाह,
वसीम तांबोळी,याकूब खान, इमरान शेख, अल्ताफ कुरेशी, वसीम शेख, शाकीर शेख, अममल शाह,रंगरेज अकिल मानियार, कुरेशी, मुश्ताक अली, आदींची उपस्थिती होती.
१५ फेब्रुवारी रोजी राजस्थान येथील भरतपुर जिल्ह्यातील घाटमिटा गावातील दोन तरुण नावे जुनेद व नासिर हे हरियाणा राज्यातील आपल्या सासुरवाडी एका लग्नकार्यासाठी बोलोरो वाहनाने गेले असता परतताना त्यांना हरियाणा येथील गोपालगड पोलीस स्टेशन अंतर्गत पिरूका गावातील बजरंग दलाचे तथा क्राईम इन्वेस्टीगेशन एजन्सी व हरियाणा पोलीस या तिघांनी संगनमत करून त्यांच्या वाहनाला टक्कर मारून थांबवले.
जुनेद व नासिर ला मारहाण करू त्यांना मरणासन्न केले नंतर फिरोजपुर झिरका पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले व हे गाईची तस्करी करत आहे म्हणून यांच्यावर कारवाई करा परंतु पोलिसांनी जुनेद व नासर ची परिस्थिती बघून त्यांनी या गोरक्षकांना तेथून परत पाठवले. या पाचही आरोपींनी जुनेद व नासिर ला भीवाणी च्या लोहारू जंगलात बोलोरो गाडी सहित जाळून त्यांची निर्दयपणे हत्या केली.
१५ फेब्रुवारी रोजी घटना घडवून सुद्धा अद्याप मारेकऱ्यांना अटक न केल्याने भारत मुक्ती मोर्चातर्फे संपूर्ण भारत भरात शनिवार २५ फेब्रुवारी रोजी निदर्शने करून माननीय जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील प्रमुख मागण्या
दोघांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करा व फाशीची शिक्षा द्या,जुनेद व नासिर च्या कुटुंबीयांना एक करोड रुपये नुकसान भरपाई द्या, त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी लावा,
भारतात अल्पसंख्यांक समाज म्हणजे मुस्लिम,शीख, ख्रिश्चन, लिंगायत व बौद्ध यांना संरक्षणा साठी कंमूनल प्रेव्हेंशन ऍक्ट बनवा, हरियाणा व राजस्थान येथील जे पोलीस यात सहभागी आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
शनिवार सुटीचा दिवस असतांना निवासी उपजिल्हाधिकारी नितीन पाटील हे कार्यालयात हजर असल्याने शिष्टमंडळाने त्यांना निवेदन देऊन आपली मागणी सादर केली
भारत मुक्ती मोर्चाचे सुमित्रा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे अध्यक्ष डॉक्टर शाकीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान कांबळे, मानियार बिरादरी चे फारूक शेख, राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मझहर खान, ईद गाह ट्रस्ट चे अनिस शाह,
वसीम तांबोळी,याकूब खान, इमरान शेख, अल्ताफ कुरेशी, वसीम शेख, शाकीर शेख, अजमल शाह,रंगरेज अकिल मानियार, कुरेशी, मुश्ताक अली, आदींची उपस्थिती होती.