भंगार बाजारातील गोरगरीब व्यापाऱ्यांना उध्वस्त करू नये-मागणी…
– मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार सह महापौर,उप महापौर, विरोधी पक्ष नेता, गटनेते तसेच जिल्हाधिकारी,आयुक्त, मुख्य सचिव यांना अल्पसंख्यांक समाजाचे साकडे…

जळगाव (प्रतिनिधि ) तत्कालीन नगरपालिकेने शहराच्या विकासासाठी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भंगार बाजाराला शहराच्या बाहेर ७०० चौरस मीटर जागेवर ११७ व्यावसायिकांना विस्था
पित करून १९९७ साली गाळे उपलब्ध करून दिले होते. ९९ वर्षाच्या या कराराला तत्कालीन नगरपालिकेने शासनाची मंजुरी न घेतल्याने तो ठराव मनपा ने २०२० ला रद्द केला या कारणासाठी त्या ११७ गोरगरीब व्यापाऱ्यांना वेठीस धरू नका अशी आर्त हात जळगाव शहरातील अल्पसंख्यांक समाजातील विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका व शासनाकडे केलेली आहे.

आयुक्त सौ विद्या गायकवाड, उप महापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्ष नेता सुनील महाजन,नितीन लढ्ढा, कैलास अप्पा, रियाज बागवान आदींना निवेदन देतांना शिष्ट मंडळ दिसत आहे.
मनपा कडे केलेली मुख्य मागणी
१) ज्या धरतीवर मनपाने एका संस्थे ला २००८ साली ९९ वर्षे कराराने भूखंड दिला होता व तो भूखंड नियमित करण्यासाठी नुकताच मनपाने २००८ चा तो ठराव विखंडित न करता त्यालाच ३० वर्षाचा करण्यात आला व १/- रुपया नाम मात्र भाड्याने देण्यात यावा असा ठराव करून शासनाकडे १२-८-२२ रोजी मान्यतेसाठी पाठवलेला आहे त्याच धर्तीवर १९९७ चा भंगार बाजाराचा ठराव ३० वर्षाच्या करण्यासाठी मनपाने विशेष सर्वसाधारण सभा बोलवुन हा ठराव पारित करावा व शासन मान्यतेसाठी पाठविण्यात यावा
२) जळगाव शहरातील इतर व्यापारी संकुलाचे व ट्रान्सपोर्ट नगर चे ज्याप्रमाणे शासनाचे व सुप्रीम कोर्टाचे निकाल लागून सुद्धा अद्याप त्या व्यापारी संकुलांच्या व्यापाऱ्यावर मानवतेच्या दृष्टीने कारवाई करण्यात आली नाही त्याच धर्तीवर भंगार बाजार व्यावसायिकांवर करण्यात येऊ नये.
शासनाकडे मागणी
भंगार बाजार कृती समितीने १०-११-२० रोजी नगर विकास मंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे मनपा अधिनियम १९४९ चे कलम ४५१(१) जे अपील सादर केलेले आहे त्यावर शासनाने त्वरित सुनावणी घेऊन सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा तो पर्यंत जैसे आहे तशी परिस्थिती ठेवावी.
अशा मागण्या करण्यात आलेल्या आहे.
निवेदना सोबत जोडली महत्वपुर्ण १८ सहपत्रे
या निवेदनासोबत तत्कालीन नगरपालिकेचे ६ ठराव, महानगरपालिकेचे ६ ठराव, व महत्व पूर्ण असे ६ मनपा ची पत्रे अशी एकूण १८ महत्वपूर्ण कागदपत्रे या निवेदना सोबत जोडलेली आहे.
मंत्री,आमदार सह शासन,मनपा महापौर, उप महापौर, विरोधी पक्ष नेता व गटनेते यांना निवेदन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री, पालक मंत्री, अल्पसंख्यांक मंत्री, जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, महानगरपालिका महापौर, उप महापौर,विरोधी पक्ष नेता, गटनेते सह आयुक्त, जिल्हाधिकारी जळगाव, मुख्य सचिव, प्रधान सचिव नगर विकास मंत्रालय यांना प्रत्यक्ष भेटून तर काहींना मेल द्वारे हे निवेदन देऊन साकडे टाकण्यात आले असून त्यात भंगार बाजारातील गरिबांच्या जीवाशी खेळू नका अशी आर्त हाक करण्यात आलेली आहे शिष्टमंडळात यांचा होता समावेश
शिष्टमंडळात मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख,कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, मनसेचे अध्यक्ष जमील देशपांडे, राष्ट्रवादी चे अध्यक्ष मझहर पठाण, काँग्रेस चे महानगर अध्यक्ष अमजद पठाण,एमआयएमचे अध्यक्ष अहमद हुसेन, हुसेनी सेना अध्यक्ष फिरोज शेख, शिवसेना महानगर अध्यक्ष झाकीर पठाण व मतीन सय्यद, राष्ट्रवादी प्रसिद्धी प्रमुख सलीम इनामदार, समाजवादी पार्टी अध्यक्ष रईस बागवान,युवा मणियार अध्यक्ष मोहसीन युसूफ, ए यु सिकलगर फाउंडेशन अध्यक्ष अन्वर खान, सिकलगर बिरादरी चे मुजाहिद खान, तांबापुर फाउंडेशनचे मतीन पटेल, मुस्लिम इदगाह ट्रस्टचे अनिस शहा, कलाम सोसायटीचे कासिम उमर सह भंगार बाजार कृती समितीचे इब्राहिम मुसा पटेल,शाकीर खान शेर खान,फिरोज खान मुस्तफा खान,बाबूसहाब गुलाम पटेल आदींचा सहभाग होता.