विनापरवाना जाळवू वृक्षाचे वाहतूक करणारे ट्रक सह तीन लाख 12 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त. वनविभागाची कारवाई..

रावेर (राहत अहमद) विनापरवाना जाळवू वृक्षाचे वाहतूक करणारे ट्रक किंमत अंदाजे तीन लाख व बारा हजार जाळवू सरपण असा तीन लाख 12 हजार किमतीच्या मुद्देमाल रावेर वनविभागाने जप्त केला.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दि . 26 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे रसलपुर ते रावेर रस्त्याने विनापरवाना जाळवू वृक्षाचे वाहतूक करणारे ट्रक क्रमांक एम एच 19 झेड 7862 ट्रक किंमत अंदाजे तीन लाख व बारा हजार जाळवू सरपण असा एकूण तीन लाख 12 हजार किमतीच्या मुद्देमाल सापडा रचून जप्त करण्यात आले. सदर वाहन चालक शेख कलीम शेख कबीर रा. रावेर यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 अन्वय प्रथम रिपोर्ट क्रमांक 01/2023 दि . 25/02/2023 चा दाखल करून गुन्हा नोंदविला आहे पुढील तपास वनपाल रावेर करीत आहे. सदर कार्यवाही वनसंरक्षक धुळे (प्रा.) दिगंबर पगार ,उपवनसंरक्षक यावल , जमीर शेख सहाय्यक वनसंरक्षक यावल ,प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाने वनपरिक्षेत्राधिकारी रावेर अजय बावणे वनपाल रावेर रवींद्र सोनवणे, वनपाल पाल श्रीमती अरुणा ढेपले, वाहनचालक विनोद पाटील यांनी केले .