अमळनेर :टाकरखेडे येथे शिवसेनेचा रोजगार मेळावा संपन्न..

0

अमळनेर ( प्रतिनिधि) शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांच्या माध्यमातून
28/2/23 सकाळी 10 ते 5 या वेळेत राजमाता जिजाऊ I.T.I टाकरखेडे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

ग्रामीण भागात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शेतकरी परिवारातील युवकांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल त्यासाठी आमचा शिवसेना पक्ष व आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे युवकांच्या पाठीशी आहेत -असे प्रतिपादन
प्रथमेश पवार यांनी मेळाव्यात केले.

रोजगार मेळाव्याला ग्रामीण भागातील 200 युवक उपस्थित होते. सदर मेळाव्याला -चेअरमन मधुकर पवार सर, शंतनु पाटील सुझुकी कंपनीचे प्रतिनिधी धर्मराज पाटील, स्वप्निल पाटील, जिजाऊ iti चे कर्मचारी तसेच टाकरखेडे येथील शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!