अमळनेर पतंजली योग पिठच्या जळगाव जिल्हा प्रभारी पदी ज्योती पाटील नियुक्ती..

अमळनेर (प्रतिनिधि ) पतंजली योग पीठ जळगाव जिल्हा प्रभारीपदी नुकतीच ज्योती पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. नागपूर येथून ऑनलाईन झालेल्या या बैठकीत राज्य प्रभारी सुधा अळीमोरे, नऊ राज्यांच्या राज्य प्रभारी शोभा भागिया,राज्य संवाद प्रभारी ऊर्मिला साजने, सोशल मीडिया प्रभारी मिनल कहारे यांनी जळगाव जिल्हा प्रभारी म्हणून ज्योती चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती केली असून चोपडा, धरणगाव, चाळीसगाव ,भडगाव, अमळनेर या पाच तालुक्यात लची जबाबदारीत्यांना देण्यात आली. ज्योती पाटील या लॉकडाऊन काळापासून ऑनलाईन योग वर्ग आयोजित करीत होते तसेच अमळनेर महिला मंचतर्फे महिलांची सूर्यनमस्कार स्पर्धा, बाल संस्कार शिबीर, अमळनेर शहरातील डि आर कन्या शाळेत योग दिनाच्यादिवशी सर्व विद्यार्थीनिंना योग व सूर्यनमस्कार शिकविले, वातावरण व शरीर शुध्दतेसाठी यग्य चिकित्सा घेणे अशी बरेच शरीरोपयोगी योग त्या शिकवितात याची दखल घेत पतंजली योगपिठाकडून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने सामान्य महिला मोठ्या पदावर जाऊ शकते याची सकारात्मक चर्चा अमळनेरात आहे. नंदुरबार जिल्हा प्रभारी संगीता पाटील व तीन जिल्हयाच्या राज्य कार्यकारणी सदस्या महानंदा पाटील
या वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात.ज्योती पाटील यांचे पती जी.एस.हायस्कुल येथे पर्यवेक्षक पदावर कार्यरत असून,दोन्ही मुली उच्चशिक्षित आहेत.पुढील काळात त्या योग प्रशिक्षण शिबीर आयोजित करणार आहेत.