पवित्र रमजान महिन्याचा अनुषंगाने रात्री १२ वाजे पावेतो बहुल भागातील दुकाने सुरू ठेवावी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निवेदन….

धुळे (प्रतिनिधि) दिनांक २२ मार्च २०२३ पासून मुस्लीम बंधु,भगिनींच्या पवित्र रमजान महिन्याची सुर्वात होत आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे अल्पसंख्यांक विभाग पदाधिकारी यांच्यावतीने धुळे जील्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना रात्री १२ वाजे पावेतो मुस्लीम बहुल भागात तेथील सर्व दुकाने सुरू ठेवण्याच्या सवलती संबंधी निवेदन देण्यात आले….
धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने येऊ घातलेल्या सर्व मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याच्या अनुषंगाने शहरातील बहुतांश मुस्लिम बहुल भागातील गोर गरीब आणि गरजू तसेच शहरात पॉवर लुम मधील कामगार यांना रमजान महिन्यात भेडसावणाऱ्या समस्यांकडे धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे कारण की रमजान महिन्यात बहुतांश मुस्लिम भागातील कामगार वर्गाच्या मिळणाऱ्या सुट्टीच्या वेळेसच त्या त्या भागातील दैनंदिन जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी चा बाजार वेळेनुसार बंद होऊन जात असतो. त्याकरिता किमान रात्री १२ वाजेपर्यंत मुस्लिम बहुल भागातील बाजार सुरू ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी व तसेच कायदा सुव्यवस्था राखण्या संबंधी माननीय उच्च न्यायालय ने निर्देशित केलेल्या वेळेचा मान राखत. धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदना संबंधी महाराष्ट्र राज्य प्रशासनातील वरीष्ठ स्तरीय चर्चा करून लवकरात लवकर त्या विषयी आदेश पारित करण्यात यावे ही विनंती करण्यात आली आहे.
या वेळी नगरसेवक- अब्दुल लतीफ अन्सारी,नगरसेवक- मुख्तार मन्सूरी,अकबरअली सय्यद सर,जावेद भाई अन्सारी,आबीद भाई मण्यार,रईस मन्सूरी,जमीर भाई शेख आदि व धुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती जमीर भाई शेख यांनी दिली व श्री अविनाश भाऊ लोकरे प्रसिध्दी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख राष्ट्रवादी काँगेस धुळे शहर कार्यकारणी यांनी प्रसिध्द केली