अमळनेर पालिकेच्या 263 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर.. कोणत्याही प्रकारची कर वाढ नाही..

0

अमळनेर ( प्रतिनिधि) अमळनेर नगरपरिषद, अमळनेर अर्थसंकल्प २०२३-२४ चे ठळक वैशिष्ट्ये

दि. २८.२.२०२३ रोजी न. पा. सभागृहात सन २०२३-२४ या वर्षाची अंदाजपत्रकीय प्रशासकीय सभा

नगरपरिषद प्रशासक तथा मुख्यधिकारी श्री प्रशांत सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागप्रमुख यांच्या

उपस्थितीत पार पडली. श्री चेतन गडकर लेखापाल यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले आणि सदर सभेपुढे रक्कम रू. २६३,०९,७०,०००/- मात्रचे अंदाजपत्रक सादर केलेले व त्यास मंजूरी प्रदान केली. उळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे- अमळनेर नगपरिषदेचे महसुली व भांडवली जमा-खर्चाचे अंदाजपत्रक प्रारंभीक व अंतिम शिल्लकेसह

अनुक्रमे रक्कम रू. ७१.११,३७,०००/- व १९९,९८,३३,०००/- असे एकूण रू. २६३,०९,७०,०००/-

मात्रचे आहे.

सदर अंदाजपत्रक रक्कम रू.२७,३३,०००/- मात्र ने शिल्लकी असून यात रोख स्वरूपात ३,२८,०००/- व बँकेतील विविध खात्यातील शिल्लक रू. २४,०५,०००/- मात्र दर्शविण्यात आलेली आहे.

सदर अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची करवाढ न करता आर्थिक वाढीचे नियोजन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. ● त्याकरीता प्रशासकिय खर्चात काटकसरीचे धोरण अवलंबीण्याचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्र राज्य सुर्वण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत अंदाजित ३० कोटी रुपयाचे प्रस्ताव शहरातील वाढीव भुयारी गटार योजनेसाठी प्रयोजन करण्यात आले. अमृत योजना २.० अंतर्गत अंदाजित ८० कोटी रुपयाचे प्रस्ताव शहरातील नागरीकांना पिण्याचे पाणी

२४७ उपलब्ध करुन देण्यासाठी व नविन जलकुंभाचे बांधकाम करणे तसेच शहरासाठी नविन पाईप लाइन

टाकणेसाठी प्रयोजन करण्यात आले.

महाराष्ट्र नगरोत्थान योजने अंतर्गत अंदाजित १० कोटी रुपयाचे प्रस्ताव शहरातील रस्ते रुंदीकरणसह भुयारी मार्ग बांधकाम करणेसाठी प्रयोजन करण्यात आले. अमृत सरोवर व अमृत उद्यान (ताडे नाला) विकसित करणे साठी अंदाजित ४ कोटीचे प्रयोजन करण्यात

आले.

कायद्यातील तरतूद व शासन निर्देशानुसार दुर्बल घटक कल्याण निधी ९०,००,०००, अपंग कल्याण निधी १५,००,००० व महिला व बाल कल्याण विकास १५,००,००० या कल्याणकारी योजनांवर विशेष तरतूद करण्यात आलेली आहे.

शासन निर्देशानुसार आंतराष्ट्रीय पोष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करण्यासाठी १०,००,०००/- विशेष तरतूद करण्यात आलेली आहे.

न.पा.चे व्यापारी संकुलाचे लिलावाद्वारे उत्पन्नात भरीव वाढ करण्याचे प्रयोजन आहे.

सर्व मालमत्ताचे GI सव्र्हेक्षण करण्याचे काम सुरु असुन त्यानुसार पुढील वर्षा पासून कर आकारणी केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!