गोपी गोल्ड इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन तसेच गणितीय प्रदर्शन सादर करण्यात आले..

एरंडोल (प्रतिनिधि )ग्रामीण उन्नती मंडळ संचलित गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान दिवस गणितीय दिवस साजरा करण्यात आला, विद्यार्थ्याकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेचे अध्यक्ष भाऊसो श्री सचिन विसपुते यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच डॉक्टर ए पी.जे. अब्दुल कलाम, शकुंतला देवी, सी व्ही रमण, एडिसन, न्यूटन ,या शास्त्रज्ञाची माहिती देण्यात आली , तसेच श्रीनिवास रामानुजन -ज्ञानेश्वर मराठी चंद्रनाथ भोस -उदय चित्ते शकुंतला देवी- पलक पाटील इयत्ता सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून त्यांचा रोल सादर केली, या प्रदर्शनात विविध 36 विषयावर आधारित पोस्टर प्रेसेंटेशन सादर करण्यात आले, त्यात प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन, इंटरनॅशनल अँड इंडियन नंबर , मॅथेमॅटिकल इक्वेशन, जॉमेट्री कल थिंग्स , वास्तुशास्त्रात गणित, बैजिक सूत्र, घड्याळ, कालनिर्णय, मल्टिप्लिकेशन्स मॅथेमॅटिकल, इन्स्ट्रुमेंट असेंडिंग ऑर्डर, अशी
विविध पोस्टर प्रदर्शन सादरीकरण करण्यात आले,
तसेच माध्यमिक विद्यामंदिर चे विज्ञान चे शिक्षक श्री. एच. डी पाटील सर यांनी प्रदर्शनाचे परीक्षण केले, तसेच वैज्ञानिक काळात नाविन्यता व गणितीय विषयाची जोड असेल तर उत्तुंग यश संपादन करण्यास मदत होईल व अपयश येत असेल तर अपयशी तुम्हाला नवीन निर्मिती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत असते, असे प्रतिपादन केले ,व परीक्षण करत असताना विद्यार्थ्यांशी सोबत सुसंवाद साधून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले,तसेच संस्थेचे अध्यक्ष भाऊसो. श्री. सचिन विसपुते सर यांनी विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा असून त्यासोबत व्यवहारिक ज्ञान उज्वल करण्यासाठी गणिताची जोड असेल तर भविष्यत प्रगती करण्याशिवाय आपल्याला कोणी रोखू शकत नाही, तसेच मार्ग कठीण आहे म्हणून सोडून न देता प्रत्येक संधीचं सोनं करा , गणितीय वैज्ञानिक घडामोडीत यश संपादन करण्याचे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले, प्रदर्शनात लहान गटात प्रथम क्रमांक मारूफ नाजीर पटेल इयत्ता चौथी, ज्ञानदा उमेश पवा र std 2 द्वितीय क्रमांक तसेच तृतीय क्रमांक दिव्या अनिल चौधरी पारितोषिक पटकावले तसेच मोठ्या गटात ओम सचिन विसपुते स्टॅंडर्ड नाईन यांनी प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय क्रमांक, डिंपल अनिल चौधरी व तृतीय क्रमांक आदिती उमेश पवार या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले , विद्यार्थ्यांना सदर केलेले उपकरण पाहून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले ,कार्यक्रमास माध्यमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. अंजुषा चव्हाण तसेच गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य सौ. रूपाली जाधव यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रगती राजपूत व आभार प्रदर्शन संदीप. सपकाळे सर यांनी केले , तसेच तसेच विज्ञान गणित विषय शिक्षिका हिना मॅडम ,दिपाली मोराणकर, गौरी विसपुते, यांचे मार्गदर्शन लाभले, व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.