राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रगती कोचिंग क्लासेस येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन..

0

“विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करावी” : मा आमदार आबासो. डॉ बी एस पाटील.

अमळनेर (प्रतिनिधि )राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रगती कोचिंग क्लासेस येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुक्याचे माजी आमदार आबासो डॉ. बी. एस पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले व प्रमुख अतिथी मोरया हॉस्पिटलचे स्त्रीरोगतज्ञ दादासो डॉ.दिनेश महाजन, लोकमान्य हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक श्री मनोहर महाजन सर,प्राचार्य प्रकाश महाजन , कैलास महाजन सहसचिव क्षत्रिय माळी समाज मंडळ,आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करावी” असे मा आमदार आबासो. डॉ बी एस पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. तसेच श्री मनोहर महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांचे सादरीकरण ऐकुन घेतले.

या प्रदर्शनात एकुन 60 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला
हे विद्यार्थी पूर्व प्राथमिक,प्राथमिक व माध्यमिक व या तीन गटात विभागण्यात आले.या प्रदर्शनाचे परीक्षण प्रा.स्वप्निल पवार सर व श्री गोपाल हडपे सर यांनी काम पाहिले.

या प्रदर्शनास दिवसभरात अनेक मान्यवर, पालक,स्नेही जणांनी भेट दिली.या प्रदर्शनाचा समारोप निवृत्त गटशिक्षणाधिकारी मा.अशोक बिऱ्हाडे साहेब व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र भाऊ महाजन प्रा पवन पाटील सर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विजेते विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
माध्यमिक गट (8 ते 9)
1)प्रथम : गायत्री गणेश वानखेडे
2)द्वितीय : खेमराज अरविंद पाटील
3)तृतीय :रोशन जगदीश सोनवणे
चेतन शांताराम चौधरी
उत्तेजनार्थ :
1)आदित्य रुपेश बोरसे
2)मोक्षा विशाल चौधरी
3)भाविका जगदीश महाजन व
प्राजक्ता अनिल पवार

उच्च प्राथमिक गट (5 ते 7)
1)प्रथम : निल विकास ठाकरे
2)द्वितीय : आर्यन गणेश वानखेडे
3)तृतीय : निलय प्रसाद ओवे
उत्तेजनार्थ :
1)माही क्षितिज जैन
2)उपासना ज्ञानेश्वर निकम व ईश्वरी अतुल चौधरी
3) नील शरद बिऱ्हाडे

प्राथमिक गट (1 ते 4 )
1)प्रथम : हितांशू कन्हैया महाजन
2)द्वितीय : आरुष रुपेश बोरसे
3)तृतीय: नियुक्ती गणेश महाजन
उत्तेजनार्थ :
1) हिमांशी निलेश महाजन
2) नकुल मुकेश महाजन

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक अनिल माळी संदीप महाजन सर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!