आमदार फारुख शाह यांचे विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल..!
सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अर्थसंकल्पीय कामे अंतर्गत पंचवटी झेरॉक्स ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतच्या १ कोटी ७० लक्ष रुपयाचे रस्त्याच्या कामाचे आ.फारुख शाह यांचे हस्ते शुभारंभ…!

धुळे. (अनिस अहेमद) धुळे शहरातील प्रमुख मुख्य वर्दळीचा रस्ता असलेला पंचवटी व शहरातील बाजारपेठ असलेल्या रस्त्याचे काम सुमारे २० वर्षापासून झालेले नव्हते या रस्त्यांवर जिल्ह्यातील लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते हा रस्ता खराब झाल्यामुळे अनेक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता याबाबत धुळे शहरातील व्यापारी संघटनांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली होती की पंचवटी झेरॉक्स पासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत रस्ता व्हावा.याबाबत आमदार फारुख शाह यांनी याची तत्काळ दखल घेत मागच्या वर्षी या रस्त्याबाबत पाठपुरावा केला होता.त्याला यश येवून महाराष्ट्र शासनाने या रस्त्यासाठी १ कोटी ७० लक्ष रुपये मंजुर केले आहे. धुळे शहराचा विकास करतांना आमदार फारुख शाह यांच्या दूरदर्शीपणामुळे सगळ्या घटकांना बरोबर घेवून शहराच्या प्रमुख रस्ते जसे जळगाव चौफुली ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यत तसेच संतोषी माता ते गुरुद्वारापर्यंत, हॉटेल कृष्णाईपासून ते नेहरू पुतळ्यापर्यंत शहरातील प्रमुख महामार्गाचे रस्त्यांचे करोडो रुपयाचे काम आमदार फारुख शाह यांनी आजपर्यंत केलेले आहे. सर्व समाजाला समान न्याय या पद्धतीने शहर विकासाचे काम चालू असून विरोधकांनी विकासाच्या कामासाठी किती विरोध केला तरी शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचे काम आमदार फारुख शाह करीत त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अर्थसंकल्पीय कामे अंतर्गत पंचवटी झेरॉक्स ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतच्या १ कोटी ७० लक्ष रुपयाचे कामाचे उद्घाटन आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस आ.फारुख शाह यांचे सोबत नगरसेवक गनी डॉलर, माजीनगरसेवक गुलाब माळी,तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आघाव,नगरसेवक नासिर पठाण, प्रा.मोहन मोरे,कैसर अहमद,जमील खाटीक,इकबाल शाह,फकिरा बागवान,,शाहिद शाह,,उपअभियंता धर्मेंद्र झाल्टे, कनिष्ठ अभियंता राहुल पाटील, नझर खान,रिझवान पठाण,बबलू शेख,आदी उपस्थित होते.