माता झाली वैरी स्वतःच्या मुलाची केली हत्या. आईला जन्मठेपेची शिक्षा.

0

चोपडा तालुक्यातील चाहर्डी येथील घटना

अमळनेर (प्रतिनिधि) चोपडा शहर पो स्टे गुरन 24 / 2010, सेशन केस नं. 81/ 2019 गुन्हा कलम 302 भा.द.दि. मधील आरोपी गिताबाई दगडू पाटील वग-35 आरोपी क. 2 संभा उर्फ समाधान विलास पाटील य 25 वर्षे रा. चहार्डी ता. चोपडा ि जळगाव यांनी दिनांक 2 फेब्रुवारी 2010 रोजी भगत मंगेश दगडू पाटील आरोपी क. 1 चा मुलगा याने आई गिताबाई दगडू पाटील व आतेभाउ समाधान विलास पाटील यांच्यात अनैतिक संबंध करतांना पाहिल्याने पपांना सागुन देईल असे म्हटल्याने आई गिताबाईनें बाजुला पडलेल्या काठीने मुलाच्या डोक्यास मागील बाजुस तिन चार वेळा मारल्याने त्याचे होके फोडून तो बेशुध्द झाला. त्याच्या तोंडात कापटी बोळा कोंबुन आरोपी 2 समाधानव्या घरात मंगेश के शव लपवुन ठेवले व रात्री 12:00 नंतर दोघांनी मयत मुलगा याच्या तुकडे करून काही तुकडे जाळून पुरावा नष्ठ करण्याचा प्रयत्न केला व बनाव दाखविला की, मयतास कोणीतरी अज्ञाताने अपहरण करुन किंवा नरबळी झाल्याचा बनावट प्रयत्न करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचा मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद मयताचे वडील दगडू लोटन पाटील यांनी दिली होती. मा. न्यायालयात आरोपी विरुद्ध भा.द.वि. कलम 302 201 व 34 प्रमाणे दोषारोप ठेवण्यात आला. सदर कामी मा. जिल्हा न्यायाधीश 2 श्री. पी.आर.चौधरी साहेब यांचेपुढे सदरच्या खटल्याचे कामकाज चालले त्यात सरकारी वकील अॅड. किशोर आर. बागुल, मंगरुळकर यांनी कामकाज पाहिले सदर खटल्या एकुण 15 साक्षीदार तपासले. सदर खटल्यातील सरकार पक्षा तर्फे गिताबाईचे पती दगडु लोटन पाटील तसेच बहीण प्रतिमा दगडु तसचे प्रदिप कुलदिप पाटील, डॉ. निलेश देवराज तसेच डॉ. स्वप्नील कळसकर तसेच “श्वान पथक जळगांव व तपासणी अधिकारी श्री मनोज पवार. ए.पी.आय. योगेश तांदळेएए.पी. आय यांनी प्रथमिक तपास केला तदनंतर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पुढील तपास केला. सदर खटल्यात मा. न्यायालयाने (जन्मठेपेची शिक्षा व दंड रुपये 300/- दंड व दंड नभरल्यास 15 दिवस सश्रम कारावास, तसेच मा.द.वि. कलम 201 प्रमाणे दोन वर्षे सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सदर आरोपी क. 1 व 2 त्यांचे अटकेपासून कारागृहात होता. या कामी पैरवी अधिकारी ए.एस.आय. उदयसिंग साळुंके व पो.नाईक हिरालालपाटील व चोपड़ा शहर पोलीस स्टेशन चे पोलीस कॉ. नितीन दिलीप का मो हवलदार हरीप तेली यांनी काम पाहीले आरोपी कारागृत असल्याने वकील लावण्याची परिस्थीती नसल्याने त्यांना शासनाकडून विधी सेवा समिती कडुन वकील नेमण्यात होते त्यामुळे आरोपीतांना कमीत कमी दंड करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!