मुलीची छेड काढणाऱ्या रोड रोमियो विरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल..

अमळनेर येथील एका काॅलेजची मुलगी काॅलेजवरुन परत घरी जात असतांना चार टवाळखोर मुलांनी तीची छेड काढली.
त्यापैकी,
1)अनिरुद्ध अर्जुन चांडाले याने तिला अश्लील आवाज देवून तिच्याकडे येवून तीला स्पर्श करुन तीचा विनयभंग केला.
उर्वरित त्याचे टवाळखोर जोडीदार
2.)चंद्रकांत राजेंद्र पाटील,
3) अविनाश अर्जुन चंडाले,
4). बाळा उर्फ पंकज (पूर्ण नाव माहीत नाही)
यांनी तीला अश्लील बोलले व अनिरुद्ध ला तीला धर म्हणून प्रोत्साहन देवू लागले.
त्यावेळी तीला घेण्यासाठी आलेले तिचे पती यांनी अनिरुद्धला तीच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला असता तीच्या पतीस चौघांनी मिळून मारहाण केली.
सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे यांना मिळताच त्यांनी या आरोपींना लागलीच शोधून आणण्यास टीम पाठविल्या.
चौघांविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करून घेतला.
मुख्य आरोपी अनिरुद्ध सह वर नमूद एकूण तीघाजणांना पोलीसांनी शोधून पकडले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार मुलीवर गैरदबाव आणून प्रकरण दाखल होवू न देण्याची बाब अमळनेर पोलीसांनी यशस्वी होवू दिलेली नाही.
गंभीर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हेगारांच्या मनात अमळनेर पोलीसांची यापूर्वीच असणारी दहशत आणि त्याप्रमाणेच झालेल्या कडक कारवाई मुळे गुन्हा केल्यावर कडक कारवाई शिवाय अमळनेर पोलीस स्टेशन ला सुटका होत नाही याची दहशत गुन्हेगारांमधे पसरली आहे.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी,
अशा प्रकारच्या घटना अंमळनेर शहर व परिसरात खपवून घेतल्या जाणार नाहीत असा संदेश जनमानसात दिला आहे.
या संपूर्ण कारवाई मध्ये पोउप निरीक्षक श्री. विकास शिरोळे, सफो. संजय पाटील, पोह किशोर पाटील, पोना शरद पाटील, दिपक माळी, रवि पाटील, सिद्धांत सिसोदे, नम्रता जरे व चालक सुनिल पाटील अशांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.