तीन तालूक्यांना जोडणारा दहिगावला गिरणा नदीवर पूल व्हावा
५० गावांच्या नागरिकांची मागणी…

एरंडोल (कुंदन सिंह ठाकुर)कासोदा-एरंडोल,पाचोरा व जळगाव तालुक्यातील सुमारे ५० चे वर गावखेड्यांना जोडणारा दहिगाव संत येथे गिरण्या नदीवर पूल करण्यात यावा, यामुळे तीनही तालुक्यातील लाखों लोकांना दळणवळण सोपं होईल अशी मागणी या परिसरातून होत आहे.
एरंडोल तालुक्यातील कासोदा व उत्तरायण गटातील सुमारें ३०ते ४० खेड्यातील जनतेला जळगाव जाणे साठी हा अत्यंत जवळचा मार्ग आहे,कासोदा येथून अंतूर्ली जवखेडा, निपाणे, ताडे,भातखेडा व पिंप्री, दहिगावहून म्हसावद मार्गे जळगाव ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे अत्यंत कमी अंतराचे होणार आहे, तसेच उत्राण,हणूमंतखेडा,बाम्हणे,या परिसरातील नागरिकांनी देखील हा रस्ता जवळचा आहे,सध्या कासोदा येथून थेट पिंप्री या गावापर्यंत डांबरी रस्ता झालेला आहे, फक्त पिंप्रीहून दहिगाव हा रस्ता शेकडो वर्षांची वहिवाट असून देखील कच्च्या आहे, पारतंत्र्यात व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील या दीड दोन किलोमीटर अंतरावर अजून खडी देखील टाकण्यात आलेली नाही.
पिंप्री ते दहिगाव हा रस्ता डांबरीकरण करुन दहिगाव जवळ गिरणा नदीवर पूल झाल्यास या परिसरातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे अत्यंत सोपे होणार आहे,वेळ,व पेट्रोल डिझेल देखील वाचणार आहे.
तसेच पाचोरा तालुक्यातील दहिगाव,वरसाडे,डोकलखेडे,जवखेडा,पाथरी,बांबरुड,लासगाव,सामनेर,वडलीसह अनेक गावांना कासोदा,पारोळा व धुळे येथे जाणे अत्यंत कमी अंतराचे होणार आहे, हल्ली येथील नागरिकांना म्हसावद एरंडोल मार्गे कासोदा व पारोळा-धुळ्याकडे जावे लागते,वेळ जास्त लागतो व पेट्रोल डिझेलचा खर्च देखील वाढतो आहे.
जळगाव तालुक्यातील बोरनारे, डोमगावसह या परिसरातील गावांना देखील या पुलाचा मोठा फायदा होणार आहे, फक्त पिंप्री ते दहिगाव हा दिड दोन किलोमीटर चा डांबरी रस्ता व दहिगाव बंधार्या खालून गेलेला गिरणा नदीवरचा पूल दुरुस्त करणे एवढेच काम झाले तर या ३५/४०गावांमधून सुमारे ७/८लाख नागरिकांना सुविधा होणार आहे.
एरंडोल व पाचोरा येथील आमदारांनी व पालकमंत्र्यांनी याकामी लक्ष द्यावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
—हा रस्ता होणे अत्यंत आवश्यक आहे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेली अनेक वर्षे आमचा पाठपुरावा सुरू आहे.-राजेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ता पिंप्री.