एरंडोल येथे मेनरोड वर सराफी दुकानात धाडसी चोरी,अडीच लाखांचे सोन्याचांदीचे दागीने लंपास..!

एरंडोल (प्रतिनिधि) सराफी दुकानदार हे ७ तारखेपासून आपल्या परीवारासह नाशिक येथे लग्नाला गेल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी येथील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरील माऊली ज्वेलर्स या सराफी दुकानाचे पञी शटर वाकवुन २लाख ५५ हजार किंमतीचे सोन्याचांदीचे दागीने लंपास करून पोबारा केल्याची घटना ११मार्च२०२३ रोजी राञी घडली.
या दुकानाबाहेर सी.सी.टी.व्ही कँमेरा बसविला असल्याने तपासकामी या कँमेर्यामधील फुटेज द्वारे चोरीचा धागा-दोरा सापडू शकतो असे बोलले जात आहे.
दरम्यान्
भर बाजारपेठेत दुकान फोडण्याच्या या घटनेमुळे व्यापार्यांमध्ये घबराट पसरली आहे.
६मार्च रोजी सायंकाळी सदर सराफी दुकान बंद करून प्रसाद अजय वाघ हे नाशिक येथे लग्नास गेले असता ११मार्च रोजी दुकानाच्या शेजापरी सायकल मार्ट मालक भगवान चौधरी हे भल्यापहाटे संकष्टी चतुर्थी निमित्त पद्मालय येथे जाण्याकरीता उठले असता त्यांना सराफी दुकानाचे शटर वाकलेले आढळुन आले.त्यांनी याबाबत दुकानमालक वाघ यांना कळविले.
दुकानात चोरी झाल्याची वाघ यांची खाञी झाल्यावर पोलिसांना कळविण्यात आले.
पोलिस निरीक्षक सतीष गोराडे यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
वाघ यांनी फिर्याद दिल्यावरून एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
श्वानपथक मागविण्यात आले असता बुधवार दरवाजा पर्यंत माग दाखविण्यात आला.
पोलिस उपनिरीक्षक शरद बागल,अनिल पाटील ,मिलिंद कुमावत,पंकज पाटील हे पुढील तपास करीत आहेत.