अमळनेरमध्ये एकावर चाकू हल्ला
1 आरोपी अटक, 2 फरार

अमळनेर (प्रतिनिधि) एकावर तिघांनी चाकू हल्ला व लाकडी दांडक्यांनी मारून खिशातून पैसे हिसकावून घेतल्याची घटना १० रोजी रात्री सव्वा नऊ वाजता गांधलीपुरा भागात आंबेडकर चौकात घडली.
जुबेर खान युसूफ खान रा श्रद्धा नगर वय ३० हे आर ओ फिल्टर दुरुस्तीचे काम करतात. १० रोजी ते रात्री डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात चहाच्या टपरीवर गेले असता त्या ठिकाणी काजल उर्फ रफीक शेख रशीद (वय ४०) हा आला आणि त्याने हात धरून आंबेडकर पुतळ्याच्या मागे घेऊन गेला. आणि चाकू दाखवून पैशांची मागणी करू लागला. जुबेर ने नकार दिल्यावर काजल ने त्याच्या गालावर चापट मारली तेव्हढ्यात तिकडून शाहरुख अली अख्तरअली पठाण (वय ३५) आणि अरबाज अली उर्फ काल्या अखतरअली पठाण( वय ३४) दोन्ही रा गांधलीपुरा हे आले आणि लाकडी दांडक्याने छातीवर पोटावर मारु लागले. तितक्यात काजल ने पोटावर चाकूने वार केला. तो चुकवण्यासाठी जुबेर वळल्याने त्याच्या पोटाखाली ढुंगणावर चाकू लागला. जुबेर रक्तबंबाळ झाला. पुन्हा काजल ने मानेवर चाकू लावून खिश्यातील ३ हजार ६०० रुपये ,बँकेचे एटीएम कार्ड , पॅनकार्ड पाकीट काढून घेतले. आजूबाजूच्या नागरिकांनी जुबेरला दवाखाण्यात नेले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला धुळे येथे शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. पोलीस निरीक्षक विकास शिरोळे यांनी धुळे येथे जाऊन जखमी चा जबाब घेतल्यावरून तिघा आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न आणि जबरी लूट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.