गांधलीपुरा भागातील देहविक्री व्यवसाय प्रतिबंधीत क्षेत्रातील 5 सीसीटीव्ही कॅमेरे चोरी..

अमळनेर (प्रतिनिधि ) देहविक्री व्यवसायावर नियंत्रण मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने लावलेले गांधलीपुरा भागातील ७५ हजार रुपये किमतीचे ५ सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेल्याची घटना ८ मार्च रोजी रात्री घडली.
अमळनेर नगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाने गांधलीपुरा भागात वेश्या व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे व फायबर आँपटीक केबल बसविण्यात आली आहे. एकुण २४ कँमेरे लावण्यात आलेले आहेत. व याचे नियंत्रण गांधलीपुरा चौकीत आहे. डिव्हीआर सुद्धा गांधलीपुरा चौकीत ठेवण्यात आले आहेत. अज्ञात चोरट्यानी ८ रोजी रात्री ५ सी सी टी व्ही कॅमेरे व ऑपटिकल फायबर केबल असं ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाचे आबीद शेख मोहम्मद शफी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेश्या वस्तीत येणाऱ्या ग्राहकांना लुटणाऱ्या टोळीने हे केले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. आरोपी पोलिसांच्या नजरेत असून लवकरच त्यांना अटक केली जाईल असा विश्वास पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी व्यक्त केला.