अमळनेर नगरपरिषद कर्मचारीही संपावर जाण्याचा इशारा…

अमळनेर ( प्रतिनिधि ) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी,संवर्ग कर्मचारी राज्यस्तरीय संघटनेच्या आदेशानुसार जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आज दि 14 पासून संपावर जात असल्याने अमळनेर न प कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनानी देखील मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या वतीने उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले.सदर निवेदनावर भारतीय कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सोमचंद संदानशिव,अध्यक्ष प्रसाद शर्मा,उपाध्यक्ष महेश जोशी,भारतीय मजदूर महासंघाचे सरचिटणीस अविनाश संदानशिव,अ भा सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल बॅंडवाल,जनरल सेक्रेटरी किशोर संगीले,भारतीय मजदूर संघाच्या महिला प्रदेशाध्यक्ष राधा नेतले,अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष बिंदू सोनवणे,सरचिटणीस राजेंद्र चांडाले यासह पदाधिकारी उपस्थित होते.