जिल्हा मनियार बिरादरीच्या वतीने शौक जलगावी यांच्या स्मरणार्थ शोकसभा संपन्न..

शहर ए अदब का वालीये गुफ्तार चल दिया…. जळगाव
जळगाव (प्रतिनिधि) १३ मार्च सोमवारी रात्री इकबाल हॉल मेहरून येथे सैयद नासिर उर्फ शौक जलगावी च्या शोक सभेचे आयोजन जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरी तर्फे करण्यात आले होते या शोक सभेच्या अध्यक्षस्थानी बिरादरीचे ज्येष्ठ उपअध्यक्ष तथा कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चाँद होते.
शोक सभेची सुरवात हाफिज शाफिक यांच्या कुरान पठाणाने झाली.
शोकसभा आयोजनाचे महत्व
शोकसभेचे महत्त्व विशद करताना बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी शौक जलगावी जे एक खान्देश मिल चे कामगार असतांना सुद्धा त्यांनी उर्दू साहित्यासाठी केलेली सेवा, लोकसहभागातून लिहलेली १२ पुस्तके, बजमे यारा तर्फे किती व कशी मोलाची सेवा केली हे विशद करून वयाच्या ९१ व्या वर्षी जगाला निरोप दिला त्यांच्या सेवेचे तरुण पिढीला ज्ञान व्हावे म्हणून या शोकसभेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
उर्दू साहित्यिक,पत्रकार, कवी व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग
शोक सभेत जळगाव शहरातील उर्दू साहित्यिक, कवी ,पत्रकार यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता त्यात प्रामुख्याने शौक जलगावी चे सुपुत्र डॉक्टर शफिक नाजीम,रागीब ब्यावली, हाफिज शफिक रहमान, काझी जमीर अश्रफ, जेष्ठ पत्रकार अलीअंजूम रिझवी, सईद पटेल,फैजान रफिक शेख, साहित्यिक खलील अहमद खलील, डॉक्टर असलम, नियाजोद्दीन मलिक, रियाज अहमद रियाज, अनिस शहा,अक्रम देशमुख, शाहीद जिलानी, आबिद हारून, अकील मणियार, एडवोकेट बुऱ्हाण पिरजादे व आमीर शेख, रऊफ टेलर, मुजाहिद खान, सलीम इनामदार, शकील अंजूम, अखलाक निजामी, अजमल जनाब,रशीद पिंजारी, उमर कासीम, आदींची उपस्थिती होती.
सादर निवडक कवितांचा सार
शहर ए अदब का वालीये गुफ्तार चलदिया।
बाजार ए इलम फन का खरीदार चल दिया ( रागिब ब्यावली)
पैकर ए अखलास साधा लहू हमारे शौक चाचा
शहर मे जो थे अदब की रूह हमारे शौक चाचा( रियाज अहमद रियाज)
इलमो हिकमत की उडाने शौक जलगावी के नाम। लहजा व शिरी जुबाने शौक
जलगावी के नाम (मुश्ताक साहिल)
खादी मे शेरो सुखन वाकिफे सररेनिहा।
शौक से तुने सजाया गुलशन ए उर्दू जुबा (अली अंजुम रिजवी)
सोशल मीडियाच्या माध्यमाने ऑन लाईन यांनी दिले संदेश
अनिस कयफी, काझी मुश्ताक अहमद, मोहसीन जलगावी आणि मंजूर नदीम यासारख्या दिग्गज कवींनी मोबाईल द्वारे आपले विचार शोकसभेत सादर केले
पुस्तके प्रकाशित करणार- फारूक शेख
वृद्ध व थोर उर्दू साहित्यिक व कवी यांची पुस्तके छापून प्रकाशित करण्याचा संकल्प जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी सभेसमोर व्यक्त केला व ज्या वृद्ध उर्दू साहित्यिक कवी यांनी लिहिलेले कविता साहित्य बिरादरीकडे दिल्यास त्याची छपाई करून प्रकाशित करण्याची जबाबदारी मानियार बिरादरी घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले..