राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या प्रयत्नाने उस्मानिया पार्क येथे मुरूम रस्त्यांचे काम चालू..

जळगाव ( प्रतिनिधि ) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग जळगाव जिल्हा व उस्मानीया पार्कच्या मान्यवरांच्या प्रयत्नाने पार्क येथील रस्त्यांचे काम चालू झालेले आहे.
पुढच्या आठवड्यापासून रमजानचा पवित्र महिना चालू होत आहे त्यामुळे अश्रफुल फुकहा मस्जिद व उस्मानिया मस्जिद यांना जोडणारा रस्ता सर्वप्रथम बनवण्यात येत आहे.
यानिमित्ताने वार्डाचे नगरसेवक नवनाथ भाऊ दांडकुंडे यांचे उस्मानिया पार्क तर्फे विशेष आभार मानण्यात आले तसेच महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण भाऊ पाटील व आयुक्त गायकवाड मॅडम या सर्वांचेही उस्मानिया पार्क तर्फे आभार मानण्यात आले.
कामाचे उद्घाटन प्रसंगी नगरसेवक नवनाथ भाऊ दारकुंडे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर भाई पठाण, जाकिर भाई शेख, विजय भाऊ राठोड, नईम भाई शेख, मनपा युनिट इंजिनियर जितेंद्र रंधे, सुपरवायझर फारुख भाई कादरी, प्रकाश भाई चौधरी, शांताराम भाऊ सोनवणे उपस्थित होते..