वाणिज्य प्रश्नमंजुषा व सादरीकरण स्पर्धेत प्रताप महाविद्यालय प्रथम ..

अमळनेर (प्रतिनिधि) कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि झेड.बी.पाटील महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै.भास्कर सबनिस वाणिज्य व व्यवस्थापन प्रश्नमंजुषा व सादरीकरण स्पर्धा झेड. बी. पाटील महाविद्यालय धुळे येथे पार पडली. या स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. या स्पर्धेत धुळे , नंदुरबार, जळगाव या तिनही जिल्ह्य़ातील 11 महाविद्यालयातील संघ सहभागी झा
ले होते.
सदर स्पर्धेमध्ये प्रताप महाविद्यालयाला प्रथम क्रमांकाचे सांघिक पारितोषिक प्राप्त झाले.
या स्पर्धेमध्ये प्रताप महाविद्यालयाच्या वतीने खालील यशस्वी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
- गुंजन मोहन जैन (M.Com. I)
- अनुराधा थावरानी (TYBCOM)
- अंजली तोलानी(TYBCOM)
सदर स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेचे प्रमुख डॉ. योगेश तोरवणे तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापिकांनी मार्गदर्शन केले.
खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष-श्री.हरी भिका वाणी, कार्योपाध्यक्ष-श्री.योगेश मुंदडे, सर्व माननीय संचालक मंडळ, मा.चिटणीस तसेच प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी.जैन आणि सर्व उपप्राचार्य, IQAC समन्वयक व सर्व प्राध्यापक बंधू-भगिनीं व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वीतांचे हार्दिक अभिनंदन केले.