अमळनेर येथे ईलाही मदरसांचे लहान मुले मुलींनी उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.

अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर शहरातील बाराभाई ऊर्फ अंदरपुरा मोहल्ला ट्रस्ट संचलीत

ईलाही अरबी मदरसाच्या माध्यमातून मोहल्लातील ट्रस्टचे माजी अध्यक्ष मुश्ताक खान गुलशेरखान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली लहान मुले मुलींनी इस्लामी स्पर्धा प्रश्न उत्तरे व पवित्र कुराण पठण यात भाग घेतला या मुलांना ईलाही अरबी मदरसा चे कारी हाजी नासीर बागवान यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुराण पठण करण्यात आले व सर्व उपस्थित मान्यवरांचे ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आले सर्व मुले मुलींना अंदरपुरा मोहल्ला ट्रस्ट तर्फे अब्बासीया मस्जिदचे मौलाना फयाज नक्शबंद,सुन्नी दावते इस्लामी चे प्रमुख शेख फयाज, अझहर मौलाना,रजा मुस्तफा मौलाना, इरफान मौलाना,इशत्याक मुबलीक, यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले त्याच बरोबर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते ही बक्षीस वितरण करण्यात आले सूत्रसंचालन मौलाना मोतेशीम नुरी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंदरपुरा मोहल्ला कमिटीचे मो.इक्बाल शेख,अफसर पठाण, सैय्यद मुबारक अली, सैय्यद गुलाम नबी सह मोहल्लातील युवकांनी व जेष्ठांनी परिश्रम घेतले