गांधीपुरा भागातील नविन पुलावरील दत्त मंदिर मार्गावरील भिंतीला रहिवाशांचा विरोध.
मुख्याधिकारी यांना दिले निवेदन..

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल येथील गांधीपुरा ते शहरातील भगवा चौक पर्यंत बांधण्यात येणाऱ्या नविन पुलाचे सध्या बांधकाम अंतिम टप्प्यात आले असुन त्यावरील दत्त मंदिराकडून येणाऱ्या मार्गावर प्रशासनातर्फे भिंत बांधण्यात येत आहे तरी सदर भिंतीला गांधी पुरा येथील रहिवाशांचा विरोध असल्याचे निवेदन मुख्याधिकारी विकास नवाळे यांना देण्यात आले.
निवेदनात अंजनी नदीवरील रंगारी दरवाजा ते भगवा चौक हा दोन्ही भागांना जोडणाऱ्या रस्त्यावर नविन पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे.सदर पुलाच्या गांधीपुरा भागाकडील दत्त मंदिराकडून येणाऱ्या मार्गावर प्रशासनाकडून भिंत बांधकाम हे अंदाज पत्रक व पुलाच्या नकाशा नुसार करण्यात येत असल्याचे बांधकाम ठेकेदाराचे म्हणणे असल्याचे म्हटले आहे तरी याबाबत गांधी पुरा भागातील नागरिकांना पुसटशी कल्पना देखील दिली गेली नसल्याचे म्हटले आहे म्हणुन सदरील भिंत बांधकामामुळे दत्त मंदिराकडून गावात जातांना डावीकडील मशिदी कडून चुना भट्टी मार्गे १०० मीटर दुर फेऱ्याने जावे लागणार असल्याचे म्हटले आहे.सदर गैरसोय मोठी घातकी ठरणार असल्याचे व याबाबत गांधी पुरा भागातील नागरिकां मध्ये तीव्र नाराजी असुन सदर भिंत बांधकाम न करता नागरिकांचा प्रवास सुकर व सोयीचा कसा होईल याकडे लक्ष देऊन त्यातील अडथळे दुर करावे व प्रशासन स्तरावर नागरिकांचा असंतोष विचारात घेऊन योग्य कार्यवाही व्हावी अशी विनंती करण्यात आली आहे.
निवेदनावर गांधीपुरा भागातील शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.